● पालकमंत्री देखील ठरले होते
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ” भाजपला 2017 सालीच राष्ट्रवादीसोबत युती करावी असं वाटत होतं. शिवसेनेची रोजची धमकी, राजीनामा खिशात घालून फिरत असल्याची वक्तव्यं, यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी अशी भूमिका भाजपने घेतली होती. यावेळी 2017 राष्ट्रवादीने आणि भाजपने एकत्रित यावं आणि सत्ता स्थापन करावी अशी चर्चा झाली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक उलथापालथी सुरू आहेत, अनेक गौप्यस्फोट सुरू आहेत.
अशात असे वक्तव्य आशिष शेलार यांनी एका मुलाखती दरम्यान केले.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी होण्यापूर्वी दोन वर्षे आधीच, 2017 साली राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युतीची चर्चा झाली होती अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली.
आशिष शेलार म्हणाले की, “भाजपला 2017 सालीच राष्ट्रवादीसोबत युती करावी असं वाटत होतं. शिवसेनेची रोजची धमकी, राजीनामा खिशात घालून फिरत असल्याची वक्तव्यं, यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी अशी भूमिका भाजपने घेतली होती. यावेळी 2017 राष्ट्रवादीने आणि भाजपने एकत्रित यावं आणि सत्ता स्थापन करावी अशी चर्चा झाली होती. भाजपच्या नेतृत्वाने नंतर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं सरकार स्थापन करु अशी भूमिका घेतली. पण नंतर राष्ट्रवादीने याला नकार दिला.”
The NCP and BJP governments would have been formed in 2017
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आशिष शेलार म्हणाले की, “यावेळी तीन पक्षांच्या सरकारला राष्ट्रवादीने विरोध केला. आपलं आणि शिवसेनेचं कधीच जमणार नाही असं राष्ट्रवादीनं सांगितलं. राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने मात्र शिवसेनेला सोडण्यास नकार दिला. पण 2019 साली सत्ता दिसताच शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली.” दरम्यान, आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
ते म्हणाले की, “राष्ट्रवादीनं ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही असं तेव्हा म्हटलं, त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असं वाटावं. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते याची साक्षीदार भाजपा आहे”.
पालकमंत्री देखील ठरले होते असा खळबळजनक वक्तव्य केले आहे. २०१७ साली घडलेल्या घडामोडींविषयी सविस्तर माहिती दिली. पण भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू”, असं आशीष शेलार यांनी सांगितलं. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिल्याचं ते म्हणाले. कारण आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली. अन सत्तेसाठी शिवसेनेला सोडायला भाजपानं नकार दिला. पण २०१९ ला सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेनं भाजपाला सोडायची भूमिका सहज घेतली”, असंही आशिष शेलार म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529156992095368/