पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कैलाश स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू होते. त्यावेळी एका जणाकडून सरणावर डिझेल टाकत असताना हातातील डिझेलचा कॅन निसटला. त्यामुळे मोठा भडका उडाला. त्या भडक्यात 11 जण जखमी झाले असून 3 जण गंभीर आहेत. ही घटना कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना शनिवारी (दि.30) सायंकाळी 6.30 वाजता घडली. Pune: 11 injured, former mayor injured in blast
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दीपक कांबळे यांनी पहाटे आत्महत्या केली होती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना ही घटना घडली. उपस्थित काही नागरिकांनी जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
अंत्यसंस्कारासाठी माजी महापौर रजनी त्रिभुवन या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या दुर्घटनेतील अपघातग्रस्त व्यक्तीने त्रिभुवन यांच्या साडीचा आधार घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला असता साडीचा पदर पेटला. त्यामुळे त्रिभुवन यांचाही हात भाजला गेला. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.
भडका इतका जबरदस्त होता की, जे डिझेल टाकत होते त्यांच्या हातातून कॅन उडालाच पण त्याबरोबर आजूबाजूचे 11 जण भाजले गेले. शनिवारी (ता. 30) सायंकाळी ही घटना घडली. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींमध्ये मृतांची आई आणि मामेसासुचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/531609701850097/
आशा प्रकाश कांबळे (वय 59, रा. घोरपडी गाव), येणाबाई बाबू गाडे (वय 50, रा. घोरपडी गाव), नीलेश विनोद कांबळे (वय 35), शिवाजी बाबूराव सूर्यवंशी (वय 55, रा. ताडीवाला रोड), वसंत बंडू कांबळे (वय 74, चिंचवड), दिगंबर श्रीरंग पुजारी (वय 40, रा. घोरपडी गाव), हरीश विठ्ठल शिंदे (वय 40, रा. हडपसर), आकाश अशोक कांबळे (रा. मुंढवा), शशिकांत कचरू कांबळे (वय 36, रा. प्रायव्हेट रोड), अनिल बसन्ना शिंदे (वय 53, रा. प्रायव्हेट रोड), अनिल नरसिंग घटवळ (रा. ताडीवाला रोड) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महात्मा फुले वसाहतीतील 40 वर्षीय दीपक कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर सायंकाळी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी परिसरातील सुमारे 300 च्या आसपास लोक आले होते.
स्मशानभूमीतील एका कोपऱ्यात अंत्यसंस्कार करण्यात येत होते. शेवटचा अग्नी देण्यासाठी अनिल शिंदे हे डिझेल टाकत होते. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाला. त्यांच्या हातातील कॅन सुटला आणि तो खाली पडताच त्याचाही स्फोट झाला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/531621575182243/
□ शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून
उन्हाळी सुट्टी सुरु संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी सन 2022 ची उन्हाळी सुट्टी आणि आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 संदर्भात शालेय शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे.