मुंबई : माझ्यानंतर माझ्या कुटुंबातील कुणीही राजकारणात येणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जनतेने लोकशाही पद्धतीने एक सरकार निवडून दिले होत आणि त्या सरकारशी बेईमानी झाली. त्यात निवडणून आलेल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मित्र जेव्हा ज्यांच्या विरोधात निवडून आले. मग एक असे सरकार आले ज्यात वसुली हा एकमेव त्याठिकाणी अजेंडा असल्याचेही ते म्हणाले. Fadnavis does not like ‘Puranpoli’ once said family politics
नेतेमंडळींना विरुद्ध विचारसरणीच्या मंडळींकडून ट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असते. यामध्ये चर्चेत असलेले एक नाव म्हणजे अमृता फडणवीस एका खासगी कार्यक्रमात त्यांनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. मी जे काही ट्वीट डिलीट केले असतील, ते देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून केले. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
मामी म्हटल्यावर काय वाटते, अशी विचारणा केली असता मला मजाच वाटते. कधी थोडं लो वाटलं, तर ट्रोल्स पाहून घ्यायचे, मीम्स पाहून घ्यायचे. फार छान वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सला खोचकपणे बोलताना धन्यवाद दिले आहेत. तसेच, आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सला नक्की धन्यवाद देईन की, त्यांच्या ट्रोलिंगमुळे माझ्या स्त्रीशक्तीचा जागर झाला. मी असेच स्वत:चे विचार व्यक्त करत राहीन आणि तुम्ही असेच ट्रोल करत राहा अशी विनंती करेन, असे त्या म्हणाल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/531354198542314/
मी न बोलणाऱ्या देवेंद्रच्या प्रेमात पडली होती. ते बाहेरच बोलतात. माझ्यासमोर त्यांची बोलती बंद असते, असं अमृता फडणवीस बोलताच एकच हशा पिकला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक प्रामाणिकपणे मान्य करतात की त्यांची पत्नीसमोर बोलती बंद होते. तर काही लोक मान्य करत नाही. 99 टक्के पती असे असतात ज्यांची बोलती बंद होते. जे 1 टक्के असतात त्यांना वेगळं व्हावं लागत.
□ पुरणपोळी आवडत नाही
पुरणपोळी खाण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. मी जिथे जातोय तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहेत.पण मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की, मला पुरणपोळी आवडत नाही. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी देऊ नका, असे स्पष्टच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मी जिथे जातोय तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहेत असं वैतागून देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, ”आमचं जन्मात कधी भांडण झालं नाही. मात्र, आता सगळीकडे लोक त्यांना पुरणपोळी देतात, मग ते घरी येऊन माझ्यावर चिडतात. म्हणून मला स्पष्ट करावं लागेल की, देवेंद्र यांच्या लहानपणीचे एक मित्र आहेत. त्यांनी लग्नाआधी मला सांगितलं होत की, देवेंद्र यांनी एका स्पर्धेत, लग्नाच्या पंक्तीत 30 ते 35 पोळ्या खाल्या आणि ते जिंकले.
मात्र लग्नानंतर माझ्यासमोर त्यांनी अर्धी पूरणपोळी देखील खाली नसल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की, मला पुरणपोळी आवडत नाही. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी नको, असे ते म्हणाले.
□ देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार का?, शिवसेना नेत्याची पातळी सोडून टीका
अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी पातळी सोडून वक्तव्य केले आहे. ‘योगी होण्यासाठी बायकोला सोडावे लागते. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?’ अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे दीपाली सय्यद यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. तसेच, दीपाली सय्यद यांचा निषेध करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/531367435207657/