मुंबई/ सोलापूर : राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान भोंग्यांविना करण्यात आली आहे. पंढरपूर, कल्याण, मनमाड, रत्नागिरी, कल्याण, कोल्हापूरसह राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान भोंगे न लावता करण्यात आले. यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले असून इतर मशिदींनीही असाच निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. MNS effect, Namaz without trumpets in many places in the state including Pandharpur
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसाठी अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
मात्र, त्यापूर्वीच राज्यातल्या अनेक भागांमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविना झाली आहे.
मुंबईतील धारावी येथे आजचे अजान आणि नमाज पठण शांततेत पार पडलं. शिवाय नागपूरमधील जामा मशिदीतही कमी आवाजात अजान पार पडले. रत्नागिरी, कल्याणसह अनेक मशिदींमध्ये अजान आणि नमाज पठण शांततेत करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा नियम पाळल्याचे मशिदीतील लोकांनी यावेळी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/533758718301862/
माहीममध्ये नेहमी अजान वाजते, त्यामुळे काही मनसैनिक तिथे हनुमान चालिसा वाजवण्यास गेले होते. पण तिथे गेल्यावर शांततेत अजान आणि नमाज पठण करण्यात आल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे. मुंब्रा परिसरातील कौसा जामा मशिदीत आज पहाटे भोंग्याविना नमाज पठण आणि अजान करण्यात आली.
मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांना महाआरती झाल्या झाल्या लगेच अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय अजय शिंदे, विजय तनपुरे बाळा शेडगे हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यात पोलिसांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे.राज्यातल्या अनेक भागांमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविना झाली आहे. रत्नागिरी, कल्याण सह अनेक मशिदींमध्ये अजान आणि नमाज पठण शांततेत करण्यात आली. धारावीतही पहाटेची अजान आणि नमाज पठण शांततेत पार पडलं.
दरम्यान , मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेतून राज ठाकरे पक्षाची भूमिका मांडत आहेत. या पत्रकार परिषदेत पत्रकारांचे प्रश्न घेतले जाणार नसून केवळ आपली आणि पक्षाची भूमिका मांडण्यात येणार आहे. काही सूचना तातडीने द्यायच्या असल्याने सहा वाजता नियोजित असलेली पत्रकार परिषद आपण एक वाजताच घेत आहोत, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533571061653961/