□ राज ठाकरे घेणार आज पत्रकार परिषद
मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना धक्का देत संदीप देशपांडे पसार झाले आहेत. यात एक महिला पोलीस खाली कोसळून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेल्याचे वृत्त आहे. MNS leader Sandeep Deshpande shocks police; Arrest of Mansainiks in the state
संदीप देशपांडे यांच्यासोबत मनसेचे नेते संतोष धुरी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप देशपांडेंनी आजच्या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर काही पोलीस त्यांच्याजवळ आले. प्रसार माध्यमांच्या गराड्यातून पोलीस संदीप देशपांडेंच्या जवळ येत असताना संतोष धुरींनी संदीप देशपांडेंच्या खांद्यावर हात टाकून ते पुढे चालू लागले. संदीप देशपांडेंना पोलिसांनी यावेळी बाजूला येण्यास सांगितलं.
संदीप देशपांडेही पोलिसांसोबत चालत पुढे आले. याच वेळी एक खासगी कार पोलिसांच्या वाहनासमोर तयार होती. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी गर्दीतून वाट काढत कार गाठली. दोघंही कारमध्ये बसताच चालकानं कार दामटवली. पोलिसांनी कारच्या मागे धाव घेऊन ती थांबवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना यश आलं नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवा दिला.
राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळची ही घटना आहे. दोघेही माध्यमांसमोर आले. माध्यमांना प्रतिक्रिया देत असतानाच पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले होते. त्याचवेळी पोलिसांना चकवा देत तिथे आलेल्या एका कारमध्ये बसून दोघेही निघून गेले. परिणामी पोलिसांचे हात रिकामेच राहिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533571061653961/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आज पुण्यातील कसबा पेठ येथील पुण्यश्वर मंदिरात मनसेकडून महाआरती करण्यात आली. मात्र महाआरतीनंतर पुण्यातून मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच संदिप देशपांडे यांना देखील ताब्यात घेण्यासाठी पोलिस आले होते. मात्र पोलिसांना धक्का देत संदीप देशपांडे पसार झाले.
काल ३ मे रोजी रमजान ईद असल्याने राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मसने कार्यकर्त्यांनी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला.
मनसेने घेतलेल्या निर्णयानुसार, आज सकाळी ११ वाजता पुण्यातील कसबा पेठ येथील पुण्यश्वर मंदिरात मनसेकडून महाआरती करण्यात आली. त्यानंतर या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाले आहेत. हिंगोली शहरातील हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी कळमनुरी इथून काही मनसैनिक निघणार होते. त्यांना कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही मनसैनिक मदिना मशिद परिसरात एका हॉटेलमध्ये चहा-पाणी पित होते. याच दरम्यान पोलिसांनी त्यांना गाठलं आणि ताब्यात घेतले.
□ राज ठाकरेंची पत्रकार परिषद
मनसेच्या आंदोलनाबाबत आणि पुढील माहिती देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात आज मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरही राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेतून भाष्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533532531657814/