मुंबई : डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने आता शेतीच्या मशागतीच्या किंमतीही वाढल्या आहेत. यामुळे याचा जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील 2 महिन्यात डिझेलमध्ये प्रति लिटरमागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या डिझेल 105 रूपये प्रति लिटर आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दर वाढीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे बजेट कोलमडत आहे. Diesel rate and farmer Diesel price hike hits farmers hardest
पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यानंतर केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे राज्यात सरासरी डिझेलचे दर १०५ रुपयांच्या आसपास आहेत.
डिझेलच्या दर वाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. दरम्यान डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. आधीच शेतकऱ्याला अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत असताना शेतीच्या मशागतीचे दर वाढल्याने मोठा फटका बसला आहे. डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/536297981381269/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या दरवाढीचा परिणाम शेतीवर मोठया प्रमाणात हाेत आहे. मशागतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरने करण्यात येणाऱ्या मशागतीच्या खर्चात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच ट्रॅक्टरमुळे तीन दिवसांची कामे आता एका दिवसात होत असली तरी इंधन दरवाढीमुळे उत्पन्न आणि खर्चाचे बजेट कोलमडत चालले आहे.
वेळेची आणि पैशाची बचत करण्यासाठी सध्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. नांगर करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठीही भाव वाढले आहेत. याचा सर्वाधिक शेतकऱ्यांना फटका बसता आहे. आता बहुतांश भागात बैलाने मशागत करण्याचे काम थांबले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने शेतीची कामे केली जातात. नांगरणी, रोटावेटर मारणे, कुरी मारणे, सरी सोडणे, ही कामे करण्यापासून ते पालाकुट्टी करण्यासाठी टॅक्टरचा सर्रास वापर केला जात आहे.
दरम्यान इंधन दरवाढीमुळे ट्रक्टरने होण्याऱ्या शेतातील सर्व कामांचे दर वाढविले आहेत. तसेच गावानुसार मशागतीचे दर वेगवेगळे असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक झळ सोसावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित दर मिळत नाही. त्यात या इंधनवाढीमुळे वाहतूक खर्चिक झाली आहे. मागच्या वर्षी एकरी 10 हजार येणारा खर्च आता 20 हजारांच्या घरात जात आहे. शेतीसाठी उत्पादन खर्च मालाला मिळणारा बाजारभाव व इतर खर्च आवाक्याच्या बाहेर चालला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/536250394719361/