□ विठ्ठल सहकारी ची राज्य सहकारी बँकेच्या ताब्यातील साखर विकण्यास परवानगी
□ सहकार विभागाचे आदेश : 22 कोटी 73 लाख रुपये उपलब्ध होणार
सोलापूर : गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेली साखर विकून शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम देण्यात यावी, असे आदेश सहकार विभागाच्या उप सचिवांनी दिले आहेत. त्यामुळे सुमारे 22 कोटी 73 लाख रुपये शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. … finally farmers of Vitthal Sahakari Sugar Factory will get Usbil Pandharpur Bhagirath Bhalke
सहकार विभागाच्या या आदेशाने गेल्या दीड वर्षांपासून लाखो रुपये अडकून पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 2020 – 21 सालच्या गाळप हंगामातील 39 कोटी 76 लाख 33 हजार रुपये एफ आर पी रक्कम थकीत आहेत. तर कारखान्याचे गोदामात 1 लाख 9 हजार 973 क्विंटल साखर विक्री अभावी पडून आहे. ही साखर विकून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत यासाठी आरआरसी कारवाई करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना आदेश देऊन सुरू केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/537887774555623/
दरम्यान राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर असलेल्या थकीत कर्जपोटी ही साखर जप्त केली होती. मात्र ही साखर विकली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ही साखर विकुन ऊस उत्पादकांचे पैसे देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार सहकार विभागाचे उपसचिव अं पां शिंगाडे यांनी राज्य सहकारी बँक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना आदेश दिले आहेत की, कारखान्याच्या गोदामात असलेली 1 लाख 9 हजार क्विंटल साखर विकून 31 रुपये किमान हमीभावा नुसार येणाऱ्या रकमेतील 22 कोटी 73 लाख रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर देण्यात यावेत आणि 11 कोटी 36 लाख रुपये राज्य सहकारी बँकेला द्यावेत. उपलब्ध पैशातून संपूर्ण एफआरपी रक्कम अदा होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध रक्कमेतून समान पद्धतीने देण्यात यावेत, असेही या आदेशात नमूद केले आहे.
● भगिरथ भालकेंच्या प्रयत्नाला यश
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवारात दुफळी निर्माण झाली आहे. यातच पोटनिवडणुकीत भगिरथ भालकेंचा पराभव झाला तर चालू गळीत हंगामात कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली. यातच भगिरथ भालके हे एकाकी शेतक-यांना ऊस बिले मिळणेसाठी प्रयत्न करीत असताना काही दिवस नागरिकांच्या संपर्कात नव्हते. यावरुन देखील विरोधकांनी भगिरथ भालके यांच्यावर टीका केली. मात्र आता साखर आयुक्तांनी परवानगी दिल्याने भालके यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/537816387896095/