मुंबई : शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केतकीने आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर तिच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. केतकीविरुद्ध पुणे सायबर विभागाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. Ketki Chitale arrested by police; BJP and Sangh support Ketki
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका करणाऱ्यांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. जीवे मारण्याची धमकी नंतर केतकीची पोस्ट यावरून चर्चा होत आहे.
या कवितेत पवारांच्या आजारपणावरही टीका करण्यात आली आहे. याचे पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी संघावर निशाणा साधला आहे. केतकी चितळे असेल किंवा शरद पवार यांना जीवे मारण्याबाबत ट्वीट करणारा भामरे असेल. यांना लहानपणी संघाच्या शाखेत जे विषारी बाळ कडू मिळालं त्याची उदाहरणे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. हे सगळं घडवून आणण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होतं आहे. त्यांनी गावा गावात 25-25 हजार रुपये पगार देऊन ट्रोलर्स नेमले आहेत. त्याच्या माध्यमातून अशाप्रकारे विष पसरवण्याचा प्रयत्न होतं असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीदेखील अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली. केतकी चितळे सारख्या विकृतींना संघाच पाठबळ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सातत्याने शरद पवार यांच्याविरोधात खालच्या पातळीवर टीका सुरू असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला. मालिका दिग्दर्शक निर्मात्यांनी अशा विकृतींना थारा देता कामा नये. अन्यथा आम्हाला वाहिनीवरील बहिष्कारासोबतच कार्यक्रमही उधळून लावावे लागतील, असा इशाराही सलगर यांनी दिला आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली आहे. केतकी इतकी विकृत असेल असे वाटले नव्हते. तिने काय लिहिले आहे हे जरा वाचा आणि तुमच्या आजोबांबद्दल वडिलांबद्दल असा कोणी लिहिलं तर काय वाटेल याचाही विचार करा असे आवाहनही आव्हाड यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील हे शरद पवारांवर राजकीय टीका करतात. त्याला आम्हीदेखील उत्तरं देतो.
शरद पवारांवर राजकीयदृष्ट्या नक्की टीका करा. मात्र, त्यांच्या आजारपणावरून टीका करत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यास तुम्हाला काही बोलता येणार नसल्याचेही आव्हाडांनी सांगितले. जीवे मारण्याची धमकी देऊन, विखारी टीका करून उंदिरासारखे का पळून जाताय असा सवालही आव्हाड यांनी केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/540559197621814/
भारतामध्ये अनेक ब्राह्मणांनी ब्राह्मण्यवादाला विरोध केला होता. यामध्ये ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद डांगे, मृणाल गोरे, पंडित नेहरू यांच्यासोबत असणारे काकासाहेब गाडगीळ, हे सगळे ब्राम्हण होते. त्यांनी ब्राह्मण्यवादाला कायम विरोध केला. त्यांनी ब्राह्मण समुदायाला विरोध केला नसल्याचेही आव्हाड यांनी म्हटले. ब्राह्मण्यवादाला कडाडून विरोध केलाच पाहिजे असेही आव्हाड यांनी म्हटले.
अभिनेत्री केतकी चितळेने जेष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेयर केली आहे. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘साहेबांबद्दल द्वेषानं गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध. महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत शरद पवार यांचं मोलाचं योगदान आहे, असं कोल्हे म्हणाले.
□ नेमके केतकी चितळे प्रकरण
अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर खालच्या दर्जात टीका करणारी कविता पोस्ट केली आहे. तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली आहे. केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. या पोस्टवर शरद पवार यांच्या चाहत्यांनी सुद्धा आक्रमकपणे उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट शेयर केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505 (2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/540534984290902/
मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. केतकी अनेकदा सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडली आहे. तिच्या अशा वक्तव्यांमुळे सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत असतात.
केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाउंटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टमध्ये ॲडव्होकेट नितीन भावे या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकीने शेअर केली आहे.
केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की, केतकी प्रसिद्धीसाठी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा भाबडा प्रयत्न करत आहे.
केतकी चितळे गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय नसते. मात्र तिच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच वादात सापडते. केतकीला काही वर्षांपासून अपस्मार हा आजार आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटे यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे.
‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, केतकी प्रसिद्धीसाठी जन्मदात्यांच्या नावाच्या जागी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/540330460978021/