पुणे : भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण करण्यात आली आहे. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. तसेच पोलिसात तक्रार दिली आहे. आज आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना आज ( १४ मे) दुपारी घडली. Criticism of Sharad Pawar, beating of BJP spokesperson Vinayak Ambekar Pune
आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे कळतंय. आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली. आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
दोन दिवसांआधी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आंबेकर यांनी पोस्ट केली होती. या वादग्रस्त पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आज शहरात आंबेकर यांना मारहाण झाली. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/540654940945573/
विनायक आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अवमानकारक पोस्ट केल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. मारहाणीत राष्ट्रवादी नेते अंकुश काकडेंचा हात असल्याचा आरोप विनायक आंबेकर यांनी केला आहे. मारहाणीची तक्रार मी पोलिसांत दिली असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
दरम्यान, ‘माझ्या कवितेत शेवटच्या 2 ओळी चुकीच्या लिहिल्या गेल्या होत्या. त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता तरी देखील त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं माझे नेते गिरीश बापट यांनी कळवल्यामुळे ती पोस्ट मागे घेत आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची माफी मागत आहे.’ असं म्हणत विनायक आंबेकर यांनी माफी मागितली.
》अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर आज शाईफेक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची कळंबोली पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर केतकी बाहेर जात असताना तिच्यावर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याचे वृत्त आहे. दरम्यान केतकीविरोधात तीन ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/540635800947487/