मुंबई : देवेंद्र फडणवीस बाबरी मशीद पाडायला गेल्यावरुन उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. तसेच, मशीद पाडण्यात आली, तेव्हा फडणवीसांचे वय काय होते? असा सवाल महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता. त्याबाबत फडणवीसांनी उत्तर देत म्हटले की, ‘1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो, जुलैमध्ये मी वकील झालो, आणि त्यानंतर वकील देवेंद्र फडणवीस डिसेंबर महिन्यात बाबरी पाडायला गेला होता. Goupyasphot – ‘When I went to demolish Babri, I was a corporator of Goregaon Thackeray
फडणवीस हे गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये उत्तर भारतीय युवा मोर्च्याच्या सभेत बोलत होते. या दरम्यान फडणवीस यांनी 2019 मध्ये अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबतही वक्तव्य केलं.
“काल कौरवांची सभा झाली आज पांडवांची सभा होतेय” अशा शब्दांत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला वादळी प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय हा देवेंद्र फडणवीस गप्प बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिला. शिवसेनेच्या सभेत भाजपवर केल्या गेलेल्या प्रत्येक आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देऊन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरोधातल्या लढ्याचे रणशिंग फुंकले.
उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे पण कोणाच्या अंगात ही हिम्मत नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकेल अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. आम्हांला मुंबई वेगळी करायची आहे पण ती तुमच्या भ्रष्टाचारापासून असा टोला फडणवीस यांनी लगावला. आमच्या तलवारी म्यान नाहीत, आम्ही मुकाबला करणारच असा इशारा फडणवीस यांनी दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/540635800947487/
उद्धव ठाकरेंकडे बोलायला काही नसले की ते पातळी सोडून बोलतात पण आम्ही तसे करणार नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांना ज्याने क्रूरपणे मारले त्याच्या कबरीवर माथा टेकणाऱ्यांचा धर्म हा राज्याचा धर्म बनला आहे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर प्रहार केला.
□ सकाळच्या शपथविधीवर प्रत्युत्तर
आरे सकाळचा शपथविधी केला. पण तो यशस्वी झाला नाही, याचा मला आनंद आहे. पण यशस्वी जरी झाला असता ना तरी माझ्या मंत्रिमंडळात कुठला वाझे झाला नसता. माझ्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख आणि त्या नवाब मलिकाची हिंमत झाली नसती. अरे ज्याक्षणी दाऊदचा साथी मंत्रिमंडळात ठेवायचा की सरकारला लाथ मारायची, ठोकर घालायची? असा विषय आमच्यासमोर आला असता त्यावेळी दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवण्याऐवजी आम्ही त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती. पण आज त्याचंही समर्थन करत आहेत. वर्क फ्रॉम जेल करत आहेत.
□ देवेंद्र फडणवीसांची ‘उत्तर’ सभा
• फडणवीसांच्या सभेत हनुमान चालिसाचं सामूहिक पठण
• छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन करून फडणवीसांनी भाषण सुरू केले.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा आहे.
• भाषणात नवे मुद्दे येतील अशी आशा होती परंतु शेवटपर्यंत लाफ्टर सभा होती : देवेंद्र फडणवीस
https://www.facebook.com/109399567404448/posts/540534984290902/