नवी दिल्ली : महागाईत सर्वसामान्य नागरीक होरपळत आहे. आता केंद्र सरकारने मोठी घोषणा करत नागरिकांना दिलासा दिला आहे. 12 घरगुती गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 200 रुपयांची सबसीडी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे 9 कोटी लोकांना फायदा होणार आहे. तसेच सरकारने पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांपर्यंतचे उत्पादक शुल्कही कमी केले आहे. हा निर्णय उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना लागू होणार आहेत. Central government subsidy on domestic gas; Petrol-diesel will also be cheaper
इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे. अबकारी कर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डीझेल स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपशासित राज्यांमध्ये याची अंमलबजावणी लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल महागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले होते. सिलेंडर बाबतीतही मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. रशिया-युक्रेन युध्दा दरम्यान वाढलेल्या महागाईमुळे केंद्र सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यावर आता हा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादक शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. डिझेल आणि पेट्रोल उत्पादन शुल्क 8 रुपये आणि 6 रूपये कमी केले आहेत. यानंतर पेट्रोल 9.5 तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार आहेत. यामुळे केंद्र सरकावर 1 लाख कोंटीचा अतिरिक्त भार पडणार आहे. शुल्क सर्वसामान्यांना सरकारने दिलासा दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545345040476563/
स्वयंकाप घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ही घोषणा केलीय. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांनाही केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. अशीही घोषणा सीतारामन यांनी आज शनिवारी केली.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर २०० रुपयांची (१२ सिलिंडर) सबसिडी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी केली असून तब्बल ९ कोटींहून अधिक लोकांना या सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईनं होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरला 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना एकूण 12 सिलेंडरपर्यंत ही सबसिडी लागू असेल.
□ केंद्राची घोषणा; स्टील आणि लोखंड होणार स्वस्त
#Announcement #स्टील #Central #Steel #iron #cheaper #surajyadigital #सुराज्यडिजिटल
□ केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आणि घरगुती गॅस सिलेंडरवरही 200 रुपयांची सबसीडी देण्याची घोषणा केली. आता त्यातच सरकारने अजून एक घोषणा केली आहे. लोखंड आणि स्टीलच्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्क कमी करणार असल्याचे सांगितले. तसेच काही पोलाद उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे, असे निर्मला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/545304790480588/