चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना मंत्रिमंडळातून बाहेर केले आहे. त्यानंतर काही वेळानेच त्यांना अटक करण्यात आली. विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी सिंगला यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. Punjab: Health Minister arrested, CM fired
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्याच सरकारमधील मंत्री विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. विजय सिंगला यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही कारवाई केली आहे. कारवाईनंतर मान यांनी पंजाब पोलिसांना विजय सिंगला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारमध्ये विजय सिंगला हे आरोग्यमंत्री होते. विजय सिंगला यांच्यावर अधिकार्यांकडून कंत्राटावर एक टक्का कमिशनची मागणी आणि भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी येत होत्या. विजय सिंगला यांच्या विरोधात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सबळ पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला.
विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक टक्काही भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की, लोकांनी मोठ्या अपेक्षेने आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले आहे. त्या अपेक्षेप्रमाणे जगणे हे आपले कर्तव्य आहे. जोपर्यंत अरविंद केजरीवाल सारखे भारतमातेचे सुपुत्र आणि भगवंत मान सारखे सैनिक आहेत, तोपर्यंत भ्रष्टाचाराविरुद्धचे महायुद्ध सुरूच राहील, असे सीएम मान म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
A case had come to my knowledge, a minister of my govt was demanding a 1% commission for every tender. I took it very seriously. Nobody knew about it, had I wanted it could have brushed it under the carpet. But I would have broken the trust of people who trusted me: Punjab CM pic.twitter.com/k4loYRashC
— ANI (@ANI) May 24, 2022
विजय सिंग यांच्यावर कारवाई करताना भगवंत मान म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी मला सांगितले की, मी लाचखोरी, एका पैशाची बेईमानी सहन करू शकत नाही. मी वचन दिले की असे पंजाबमध्ये होणार नाही. चळवळीतून बाहेर पडलेले आम्ही लोक आहोत आणि ते आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होते. म्हणून भ्रष्टाचार करणारा कुणीही असो त्याच्यावर कारवाई केली जाईल.”
भगवंत मान पुढे म्हणाले की, ‘एक प्रकरण माझ्या लक्षात आले. या प्रकरणात माझ्या सरकारचे मंत्री सहभागी होते. एका करारात माझ्या सरकारचे मंत्री एक टक्का कमिशन मागत होते. या प्रकरणाची माहिती फक्त मलाच होती. हे प्रकरण दडपता आले असते. पण असे करून मला कुणाची फसवणूक करायची नाही. त्यामुळे मी त्या मंत्र्यावर कारवाई करत आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्यात येत आहे. विजय सिंग असे या मंत्र्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.’
विजय सिंगला यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप मान्य केले आहेत. आप सरकारने हे पाऊल पहिल्यांदा उचललेले नाही, याआधीही आपने आपल्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. ‘आप’ने अशी कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे, त्याआधी 2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अन्न पुरवठा मंत्री पदावरून हटवले होते. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची चर्चा त्यांनी केली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547230863621314/