नागपूर : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे आधी बौध्द विहार होते, असा दावा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावेंनी केला आहे. “संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरं ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केलंय. तसेच ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती. ही मंदिरं पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करावीत,” अशी मागणी आगलावेंनी केली. The Vitthal temple of Pandharpur was formerly a Buddhist monastery
सध्या ज्ञानवापीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमचे विहारं परत द्या, अशी मागणी डॉ. आगलावे यांनी केली आहे. आगलावे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. पंढरपूरचे विठोबा मंदिर, ओरिसातले जगन्नाथ मंदिर, तिरुपती येथील बालाजी मंदिर अशी देशातली अनेक मंदिरं पूर्वी चैत्यगृहं, विहार आणि स्तूप होते, असं मत डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केलं आहे.
संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केले आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ (1929) या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, “ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या.” असं आगलावे सांगतात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547858610225206/
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत डॉ. आगलावे यांनी पंढरपूरचे मंदिर हे बौद्ध धर्माचे देवालय असल्याचे म्हटले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 एका भाषणात सांगितले होते की, पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन.” असा संदर्भ त्यांनी दिला आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीच्या परिसरात हिंदु देवी देवतांच्या मूर्ता सापडल्याचा दावा केला जातोय. त्यासाठी सर्वेक्षणही केले जात आहे. याच धर्तीवर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावरही अभ्यास होण्याची गरज आहे. येथील मंदिराचा इतिहास, येथील भिंतींवरील मूर्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जावा. तसेच ते पुरोहितांकडून बौद्ध लोकांच्या हाती द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत डॉ. आगलावे यांनी पंढरपूरचे मंदिर हे बौद्ध धर्माचे देवालय असल्याचे म्हटले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ एका भाषणात सांगितले होते की, पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन.”
https://www.facebook.com/109399567404448/posts/547687003575700/