मुंबई : शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वांद्रे निवासस्थानासह त्यांच्या संबंधीच्या 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. यामध्ये दापोलीच्या रिसॉर्टचाही सामावेश आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याआधी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. Shock to Thackeray government! Anil Parab on ED’s radar; Impressions are gained in a fluid, global, diffused way
अनिल परब यांच्यावर कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला असून, त्याअंतर्गत त्याच्या 7 ठिकाणी कारवाई सुरू आहे. ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे.
आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने ही कारवाई सुरू केली. परब यांनी जमीन खरेदीसाठी 1 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) ही कारवाई केली आहे. 2019 मध्ये परब यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे. तसेच अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणातही अनिल परब यांचेही नाव पुढे आले होते.
अटक करण्यात आलेले मुंबई माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी परब यांच्यावर अनेक आरोप केले होते. मंत्रीपदावर असताना कोट्यवधींची लाच घेतल्याचा परब यांच्यावर सर्वात मोठा आरोप होता. बदली – पोस्टिंगमध्ये लाच घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/548611780149889/
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा त्यांच्या विरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर हल्ला चढवला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनिल परब जेलमध्ये जाणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. तर माझ्या तक्रारींच्याच आधारे अनिल परब यांच्यावर धाडसत्र सुरु झाल्याची खात्री असल्याचे सोमय्या म्हणाले.
अनिल परब यांच्यावर होणारी कारवाई ही मी केलेल्या त्या तक्रारीचा आधारित आहे असं दिसतंय. अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी २५ कोटी रुपये वापरले आहेत हे २५ कोटी रुपये ब्लॅकमध्ये वापरले असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सात कोटी रुपये व्हाईटचे वापरले. पण या दोन्ही २५ कोटी काळा पैसा आणि ७ कोटी व्हाईट यातील हिशोब आपल्या चोपड्यात दाखवलेलं नाही.
ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले असून तपास सुरु आहे. या कारवाईनंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली असून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यावरुन संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “अनिल परब आमचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजकीय सूडबुद्धीने अशा प्रकारच्या कारवाया सुरु आहेत. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपाच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सर्वजण पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत”.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण करत अनिल परब यांना तुरुंगात जावं लागणार अशी भविष्यवाणी केली आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्यानंतर सोमय्या यांनी ट्विट्वच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई सुरु झाली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी,” असं परब यांनी म्हटलंय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/548565853487815/