मुंबई : अभिनेता आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्डा प्रदर्शित होण्याआधीचं अडचणीत सापडला आहे. उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरमध्ये काही हिंदू संघटनांनी आमिर आणि त्याच्या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने केली. अभिनेत्याचे पोस्टर्सही फाडले जात आहेत आणि जाळले जात आहेत. आमिर खान हिंदुविरोधी आहे, त्याचा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. Hindu organizations oppose Aamir Khan’s film; The posters were torn down Lalsing Chadda
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये त्याच्या विरुद्ध करीना कपूर खान दिसणार आहे. आमिर खानचे चाहते त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अभिनेता सिल्व्हर स्क्रीनपासून दूर आहे. मात्र हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट ठरेल, अशी अपेक्षा आहे. त्याचे ‘कहानी’ हे गाणे रिलीज झाले असून त्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले असून त्यांनी ‘सिक्रेट सुपरस्टार’ची निर्मितीही केली आहे.
चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2021 च्या ख्रिसमसला आणि नंतर 2022 च्या बैसाखीला येणार होता. मात्र, आता तो ऑगस्ट २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर अद्याप आलेला नाही. मात्र या चित्रपटाला विरोध सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये काही व्यक्तींनी आमिर आणि त्याच्या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने केली. अभिनेत्याचे पोस्टर्सही फाडले जात आहेत आणि जाळले जात आहेत.
सुलतानपूरच्या विजेथुआ खाममध्ये हिंदूत्ववादी संघटनेने निषेध नोंदवला आहे. आता २९ मे रोजी आयपीएलची फायनल आहे आणि त्याच दिवशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/550036430007424/
सनातन रक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल सिंह म्हणतात, “आमिर खानला आयपीएलमध्ये बोलावण्यात आले आहे. आमिर अनेकदा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधात बोलतो. हा तोच आमिर खान आहे जो हिजाबचा सर्वात मोठा समर्थक आहे. स्वतःची मुलगी फेसबुक आणि गुगलवर कसे फोटो पोस्ट करते हे सर्वांनाच माहीत आहे.” असेही सनातन रक्षक सेनेचे उपाध्यक्ष राहुल सिंह यांनी म्हटले आहे.
राहुल सिंह पुढे म्हणाले, ‘इतकेच नाही तर त्याची पत्नीही भारतात राहण्यास घाबरते. आमचे आयपीएल व्यवस्थापन अशा लोकांना कसे आमंत्रित करू शकते. याचा सर्व सनातनींना त्रास होतो. आमिरला काढून टाकावे. आणि तसे झाले नाही तर आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. सनातन रक्षक सेनेच्या वतीने अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.
याआधाही 2006 मध्ये रिलीज झालेल्या ‘फना’ सिनेमाच्यावेळीही असाच विरोध करण्यात आला होता. फना हा सिनेमा गुजरातमध्ये रिलीज झाला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाततो सहभागी झाला होता. विस्थापितांच्या बाजूने आमीरने त्यावेळी टिप्पणी केली होती. बस इतकंच कारण पुरेसं होतं. फना या सिनेमात आमीरने एका दहशतवाद्याची भूमिका साकारली होती. त्यामुळे विरोध आणखीनच तीव्र झाला.
फना चित्रपटावेळीस गुजरातमध्ये आमीरचे पुतळे जाळण्यात आले. सिनेमाचे पोस्टर्सही फाडण्यात आले होते. आदित्य चोप्रा, कुणाल कोहली यांनी त्यावेळी पत्रकार परिषदही घेतली होती. मात्र, त्याने काहीही साध्य झाले नाही. सिनेमाचा विरोध कायम राहिला. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. आदित्या चोप्राने गुजरात पोलिसांची मदत घ्यावी, सुरक्षा देण्यास सांगावे असं त्यावेळी कोर्टाने म्हटले होते. मात्र, प्रखर विरोधामुळे सिनेमा गुजरातमध्ये रिलीज झालाच नाही. या सिनेमात आमीर खानसोबत अभिनेत्री काजोल प्रमुख भूमिकेत होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/549922160018851/