नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने एक दिवस आधीच त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मुसेवाला यांना गोळीबारानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 63 views: Punjabi singer Sidhu Musewala shot dead all day long
63 जणांनी पाहिले प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसवाला याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या सोबत असणारे इतर तिघेही गंभीर जखमी झाले. आता त्याच्या या हत्येमुळे संपूर्ण पंजाब हादरले आहे. कारण कालच सिद्धू याची सुरक्षा पंजाब मधील आप सरकारने कालच कमी केली होती. त्याच्या सुरक्षेसाठी एकूण 4 बंदूकधारी व्यक्ती असायचे. पण त्यातील दोघांना बाजूला करून फक्त दोघांना तैनात ठेवण्यात आले.
या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे संगीतक्षेत्रासह मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त केला जात आहे. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांची ओळख होती.
तरुणांचा आवडता गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मुसा गावात झाला. एका पंजाबी कुटुंबात सिद्धू मुसेवाला जन्माला आले होते. सिद्धू मुसेवाला यांच्या गाण्यात एक पंजाबी स्वॅग होता. सिद्धू मुसेवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू असे होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
#WATCH | Punjabi singer Sidhu Moose Wala was shot by unknown people in Mansa district, Punjab. Further details awaited. pic.twitter.com/suuKT20hEj
— ANI (@ANI) May 29, 2022
काँग्रेस पक्षाने ट्विट केले की, ‘पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार श्री सिद्धू मूसवाला यांच्या हत्येमुळे काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि मित्रांना आमच्या मनापासून संवेदना.अत्यंत दु:खद प्रसंगी आम्ही एकजुटीने आणि अविचल उभे आहोत.’
आज त्याच्यावर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाब सरकारवर आता टीका होत आहेत. पंजाबमधील भाजप नेते मनजींदर सिंग सिरसा म्हणाले, मुसावाला मोठा गायक होता. पण अरविंद केजरीवाल आणि मान यांच्या घाणेरड्या राजकारणामुळे त्याच्यावर हल्ला होऊन तो मृत पावला. सुरवातीला ते लोकांची सुरक्षा कमी करतात आणि नंतर त्यांची नावं जाहीर करतात. हे धोकादायक होऊ शकत असा इशारा मी दिला होता.
गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याच्या मृत्यू झाल्याची घोषणा केली. पंजाब पोलिसांनी सिद्धू मुसेवालासह ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.
सिद्धू मुसेवाला यांनी गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘लायसेन्स’ असे त्याच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. ‘सो हाई’ या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू रातोरात स्टार झाले. सिद्धू मुसेवाला यांच्या ‘सो हाई’ या गाण्याला यूट्यूबवर 477 मिलिअन व्हूयूज मिळाले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/550680319943035/