सोलापूर : यंदा मान्सून लवकर अन् समाधानकारक हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सरासरी २ लाख ३४ हजार आहे. मात्र, यावर्षी तब्बल ३ लाख ४३ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होईल, असा अंदाज आहे. Kharif sowing will increase in Solapur district; Moderate soybean seeds available
सरासरीपेक्षा सव्वा लाख हेक्टरने खरिपाचे क्षेत्र वाढणार आहे. मका, उडीद, सोयाबीन पिकांना शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती असून, खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
रब्बीच्या हंगामाचा जिल्हा अशी प्रशासन दप्तरी सोलापूरची नोंद आहे.
मागील तीन वर्षांपासून जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने खरिपाची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रापेक्षाही एक ते दीड लाख हेक्टर
जास्तीच्या क्षेत्रावर खरिपाची लागवड होत असल्याने रासायनिक खते, बियाण्यांचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जिल्ह्यात खताची उपलब्धता चांगली आहे. ठराविक कंपनीच्या खतांच्या आग्रहामुळे टंचाई निर्माण होऊ शकते. बियाणे पुरेसे उपलब्ध आहेत. यावर्षी खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागातर्फे नियोजन केले आहे. सोयाबीन आणि इतर गळीतधान्य उत्पादकता वाढ , मूल्यसाखळी विकास योजनांमध्ये बार्शी तालुक्याचा समावेश झाला आहे, अशी माहिती कृषी जिल्हा अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
● सोयाबीनचे माफक बियाणे उपलब्ध
सन २०२१ मध्ये ३ लाख ४० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. ६९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. गेल्यावर्षी पावसाची संततधार लागून राहिल्याने सोयाबीन पाण्यात अडकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
त्यामुळे यंदा बाजारपेठेत चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे घरगुती बियाणे उपलब्ध होत नसल्याने महागडी बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहेत. पेरणीसाठी १९ हजार ५४८ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र एक हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. सोयाबीनच्या तुलनेत तूर, मूग, उडीद, बाजरी, मका पिकाचे पुरेसे बियाणे उपलब्ध झालेले आहे.
□ बार्शीतील तलाव दुरूस्तीसाठी दहा कोटी मंजूर
सातत्याने अवर्षण प्रवण असलेल्या बार्शी तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच काही गावच्या पाणी पुरवठा योजनांना हातभार लागावा यासाठी शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने बार्शी तालुक्यातील रुई आणि सौंदरे या दोन पाझर तलावांच्या गळती दुरुस्तीसाठी शासनाकडून जवळपास 9 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.त्यामुळे लवकरच या दोन तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.