नवी दिल्ली : केंद्र सरकारने 2021-22 या वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPF) 8.1 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर नोकरदार वर्गाला मोठा झटका बसला आहे. सध्या केंद्राकडून भविष्य निर्वाह निधीच्या बचतीवर 8.5 टक्के व्याज देण्यात येत होते. परंतु, आता यामध्ये घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दशकांहून अधिक काळातील हा सर्वात कमी व्याजदर आहे. Government slashed EPF interest form 8.5 % to 8.1% for 2021-22, EPF interest PF – reduction in interest rates; Modi government’s big blow to employees
कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ म्हणजे प्रॉव्हिडंड फंड हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात प्रॉव्हिडंड फंडाचे महत्त्व मोठे असते. मात्र आता केंद्र सरकारने ईपीएफवरील व्याजदरात कपात केली आहे. 2021-22 या वर्षासाठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे.
EPFO ने मार्च 2022 मध्ये 15.32 लाख सदस्य जोडले, या वर्षी फेब्रुवारीमध्ये असलेल्या 12.85 लाख नोंदणीकृत सदस्यांहून हे 19 टक्क्यांहून अधिक आहेत. काल शुक्रवारी (ता. 3) जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या EPFO पेरोल डेटामध्ये मार्च 2022 मध्ये 15.32 लाख निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत, असे कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. आता व्याजदरात कपात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/554307336247000/
ईपीएफच्या व्याजदरात कपात केली जाऊ शकते, अशी चर्चा आधीच सुरू झाली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणण्याच्या ईपीएफओ बोर्डाच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की 40 वर्षांपासून व्याजदर कमी केले गेलेले नाहीत आणि नव्याने कमी केलेले दर आजचे वास्तव दर्शवते. इतर अल्पबचत योजनांवरील व्याजदर आणखी कमी आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या खर्चावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना सीतारामन पुढे म्हणाले, ‘ईपीएफओचे एक केंद्रीय बोर्ड आहे जे त्यांना कोणता दर द्यायचा हे ठरवते आणि त्यांनी काही काळ त्यात बदल केलेला नाही. पण आता त्यांनी ते 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केले आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले होते की, 40 वर्षांपासून दर कमी केले गेले नाहीत. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाकडून घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात आता अर्थमंत्रालय शिक्कामोर्तब केले आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे आला होता. ईपीएफओने मार्च महिन्यात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 230 व्या बैठकीनंतर जाहीर केले होते की PF व्याज निधीला 8.1 टक्के कमी व्याज मिळेल. हा व्याजदर चार- दशकातील सर्वात कमी व्याजदर आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554319739579093/