बार्शी : मूळचा बार्शी येथील असलेला मात्र सध्या पुणे येथे स्थायिक झालेल्या बार्शीच्या तोतया डॉक्टरला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. Barshi’s totaya doctor sentenced to two years rigorous imprisonment
नंदकुमार रामलिंग स्वामी असे तोतया डॉक्टराचे नाव आहे. यास नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी नसताना वैद्यकीय साधनसामग्री जवळ बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवून महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमानुसार दोन वर्षे सश्रम कारावासाची आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास त्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
स्वामी यास यापूर्वीही गर्भलिंग निदानाचे साहित्य बाळगल्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली होती. याप्रकरणी अभियोगपक्षाच्यावतीने सरकारी वकिल सुनिल जोशी यांनी काम पाहिले. करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. केमकर यांना स्वामी वाहनामध्ये गर्भलिंग निदान व गर्भपात करत असल्याची माहिती मिळाली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/555298449481222/
त्यानुसार त्यांनी पोलिसांना बरोबर घेवून जातेगाव गाठले. तेथे एका कार मध्ये लिंगनिदानाचं साहित्य घेवून बसलेल्या स्वामी याच्याकडे एका गर्भवती स्त्रीला पाठविण्यात आले. त्या स्त्रीनं गाडीत प्रवेश करताच छापा मारुन स्वामीजवळील सोनोग्राफीयुक्त लॅपटॉप आणि शस्त्रक्रियासंबंधित साहित्य जप्त करण्यात आलं.
याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तत्कालीन पो.नि. राजेश देवरे यांनी दोषारोपपत्र दाखल केलं. न्यायालयीन सुनावणीत तपासणीला गेलेली स्त्री गरोदर असल्याचा पुरावा समोर आला नाही. स्वामी गर्भलिंगनिदान करत असल्याचे सिध्द करण्यात अभियोग पक्षास अपयश आले. विश्वासार्ह पुरावा नसल्यामुळे त्यास निदानाच्या आरोपातून दोषमुक्त करण्यात आले.
मात्र भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, 1872 च्या कलम 106 नुसार त्याच्या जवळ आढळून आलेली शस्त्रक्रिया साधने आणि औषधे बाळगण्याचा त्यास अधिकार असल्याबाबत कोणताही पुरावा स्वामी यास देता आला नाही. त्यामुळे अनाधिकृतरित्या वैद्यक व्यवसाय करण्याप्रकरणी त्यास दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली.
□ शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात
#accident #TanajiSawant #Shivsena #शिवसेना #surajyadigital #सुराज्यडिजिटल
सोलापूर : शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवंड येथे सावंत यांच्या गाडीला अपघात झाला. यातून तानाजी सावंत बालंबाल बचावले आहेत. यात गाडीचं किरकोळ नुकसान झालंय.
तानाजी सावंत यांच्या वाहनाचा शनिवारी रात्री उशिरा पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात सावंत यांच्यासह वाहनातील कुणालाही दुखापत झालेली नाही. त्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले.
तानाजी सावंत हे काल शनिवारी रात्री भूम-परांड्याहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांचे वाहन पुणे – सोलापूर महामार्गावर वरवंडमध्ये आल्यानंतर अपघातग्रस्त झाले. यात सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी बचावले असून वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555167789494288/