सोलापूर – विजयपूर महामार्गावरील नांदणी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून एसआरपीएफ पोलिसाच्या गाडीतील सहा जणांनी मिळून टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल झाला. यात चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात कायद्याचे रक्षक असलेल्यानीच कायदा पायदळी तुडवला आहे. Six persons, including SRPF police, stabbed at Nandani toll plaza
एसआरपीएफ पोलीसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेली गाडी ही एस आर पोलिसाची आहे. ती गाडी व आतील तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नागेश भीमाशंकर स्वामी (वय वर्षे 28), राहणार टोलनाका, नांदणी, ता. दक्षिण सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत फिर्यादी भीमाशंकर स्वामी, आनंद राठोड, महांतेश सोनकंटले जखमी झाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/554716232872777/
रोहन सुरेश जाधव (वय वर्षे ३०), गजानन आणाराव कोळी (वय वर्षे २९), दोघे राहणार सैफुल, सुरज बबनराव शिकारे (वय वर्षे ३१), एसआरपीएफ पोलीस शिपाई शिवशंकर बबनराव शिकारे (वय वर्षे २५) राहणार उद्धव नगर, सैफुल ! सोलापूर व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी हे सर्व जेवण करायला टाकळी येथे ( इनोव्हा त्याचा क्रमांक एम एच ०२ एक क्यू ४४५५) मधून गेले होते. जेवण करून येत असताना शनीवार, दि. 4 जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास, नांदणी येथील टोल नाक्यावर टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. दरम्यान गाडीतील चौघांनी तलवारी हातात घेऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच टोलनाक्याच्या कार्यालयाचे तोडफोड करून नुकसान केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित करपे हे करत आहेत.
● सोलापुरात सोमवारी शांता शेळके यांच्या गीतांचा कार्यक्रम
#poetry #poetess #सुराज्यडिजिटल #surajyadigital
#shantashelke #solapur #सोलापूर
सोलापूर : हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संगीत विभागातर्फे ख्यातनाम कवयित्री गीतकार शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात त्यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम सोमवारी (६ जून) सायंकाळी ६.१५ वा. वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554912239519843/