सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय पक्षाच्या मोर्चेबांधणीला वेग आला. नवीन रचनेनुसार शहरात एकूण ११३ प्रभाग झाले आहेत. शहर उत्तर आणि शहरमध्यमध्ये प्रत्येकी ४४ च्या आसपास प्रभाग आहेत. असे असले तरी महापालिका निवडणुकीत कोणाचा महापौर बसणार हे शहर उत्तर मतदारसंघच ठरवणार आहे. The city north will be decisive; Vijay Deshmukh – will Mahesh kothe work?
महापौर पदासाठी शहर उत्तर मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील दोन प्रमुख नेते आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी महापौर महेश कोठे यांची प्रतिष्ठा आता पणाला लागणार आहे. सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी यापूर्वीच अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत चार प्रभाग सदस्य पध्दती होती. त्यानंतर २०२२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पध्दती झाली आहे.
दरम्यान २०२२ साठी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एकूण ३८ त्रिसदस्यीय प्रभाग आहेत, यामध्ये ३७ प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभाग द्विसदस्यीय आहे. यातून ११३ नगरसेवक निवडणूक जाणार आहे. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ५७ चा हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे.
शहरात शहर उत्तर, शहर मध्य आणि शहर दक्षिण हे तीन मतदारसंघ आहेत. यात प्रामुख्याने शहर उत्तरमध्ये ४४, शहरमध्यमध्ये ४४ आणि दक्षिणमध्ये २५ जागा असणार आहे. शहर मध्य आणि शहर उत्तरमधून प्रत्येकी ४४ नगरसेवक निवडून जाणार असले तरी शहर उत्तर मतदारसंघच महापालिका निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहे.
मागच्यावेळी आ. विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर उत्तरमधून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. त्यामुळे भाजपचे पहिल्यांदाच एकहाती सत्ता महापालिकेवर मिळवली होती. आताही भाजपला पुन्हा सत्ता मिळवायची असल्यास आ. देशमुखांना पुन्हा एकदा चमत्कार करावा लागणार आहे.
दुसरीकडे प्रथम महापौर पदाचे स्वप्न पडत असलेल्या राष्ट्रवादीलाही शहर उत्तरमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यासाठी महेश कोठे मोर्चेबांधणी जोरात करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/555616462782754/
महापालिकेसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. त्यामुळे ज्या प्रभागात दोन महिलांचे आरक्षण पडले आहे तेथे उर्वरित एकाजागेसाठी पुरुष इच्छुकांची मोठी गर्दी आहे. शहर उत्तरमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना आ. विजयकुमार देशमुख यांचा कस लागणार आहे. दुसरीकडे भाजपकडून डावलल्या जाणाऱ्या इच्छुकांवर राष्ट्रवादीची नजर असणार आहे.
महाविकास आघाडी झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. त्यामुळे त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे देशमुख आणि कोठे या दोघांनाही उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे देशमुख आणि कोठे यांच्यात तो वरचढ ठरणार तोच महापालिका आपल्या ताब्यात ठेवणार यात शंका नाही.
□ काँग्रेस- सेनेची ताकद नगण्य
शहर उत्तरमध्ये सध्या भाजपाची ताकद जास्त आहे. गतवेळी या मतदारसंघातून काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. या मतदारसंघात शिवसेनेची ताकदही नगण्य आहे. आता या मतदारसंघात महेश कोठे यांच्यामार्फत राष्ट्रवादीने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहर उत्तरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच खरी लढत होणार आहे. या लढाईत जनता हातात घड्याळ बांधणार की हातात पुन्हा कमळ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555049432839457/