□ ४ थी खेलो इंडिया युथ गेम्स हरियान
सोलापूर : भारत सरकार आणि भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ४थी खेलो इंडिया युथ गेम्स २०२१ ही स्पर्धा पंचकुला, हरियाणा येथे गुरूवारपासून खो खो स्पर्धांना सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. Ramji of Solapur and Janhvi of Osmanabad as captains of the Maharashtra Kho-Kho team
सोलापूरचा (वेळापूर, माळशिरस) रामजी कश्यप व उस्मानाबादची जान्हवी पेठे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून डॉ. चंद्रजीत जाधव (स्पर्धा जुरी), प्रशांत पाटणकर (पंच प्रमुख), रफिक शैख, पांडुरंग गायकवाड (पंच) म्हणून स्पर्धेत सहभागी आहेत.
महाराष्ट्राचे संघ याप्रमाणे :
मुले : रोहन कोरे, ऋषीकेश शिंदे, अर्नव पाटणकर (तिघे कोल्हापुर), शुभम थोरात (पुणे), आदित्य कुदळे (अहमदनगर), रामजी कश्यप – कर्णधार (सोलापूर), चंदु चावरे (नाशिक), आकाश तोंगरे (ठाणे), किरण वसावे (उस्मानाबाद), नरेंद्र कातकडे (अहमदनगर), सुफियान शेख (ठाणे), कोमल महाजन (नागपुर), राखीव: ऋषिकेश खोमणे (पुणे), मतिन सय्यद (सांगली), रितेश काडगी (पुणे).
मुली : श्वेता वाघ, दिपाली राठोड (दोघी पुणे), जान्हवी पेठे – कर्णधार, संपदा मोरे, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, (चौघी उस्मानाबाद), अंकिता लोहार (सांगली). कौशल्या पवार (नाशिक), श्रेया पाटील (कोल्हापुर), प्रिती काळे (सोलापुर). वृषाली भोये (नाशिक), मयुरी पवार (औरंगाबाद), प्रतिक्षा यादी : रागिनी लोखंडे (अमरावती), साक्षी पाटील (सांगली), दिक्षा सोनसुळकर (ठाणे).
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
