सोलापूर : वळसंग येथे दोन गटात झालेल्या हाणामारी तसेच दगडफेक प्रकरणात ७१ जणांवर वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. In Walsang, Phulare-Katare clashes between two groups, crime against 71 people
काल बुधवारी ( दि, ८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वळसंग बसस्थानकासमोर फुलारी आणि कटरे गटात तूफान हाणामारी तसेच दगडफेक झाली यात अनेकजण जखमी झाले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते, या हाणामारी तसेच दगडफेक प्रकरणात यासीन अब्बास कटरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फुलारी गटातील ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला.
हाणामारी तसेच दगडफेक झाली. यात अनेकजण जखमी झाले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते, या हाणामारी तसेच दगडफेक प्रकरणात यासीन अब्बास कटरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फुलारी गटातील ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मोहसीन वजीर तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कटरे गटातील ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
काल बुधवारी झालेल्या हाणामारी तसेच दगडफेक प्रकरणामुळे सध्या वळसंग गावात तणावाचे वातावरण आहे. शांतता आणि कायदा सुव्यवस्था बाधित झाली आहे. यासाठी वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले येथील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवतील का? असा सवाल वळसंगकर करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
-□ भारतीय स्टेट बॅकेचे एटीएम कट करून २६ लाखांची रोकड लंपास
मोहोळ : मोहोळ – विजापूर हायवे वरील कुरुल रोड लगत असलेल्या शहरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने कट करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दि.८ जून रोजी पहाटे ३ वाजणेचे सुमारास घडली. दरम्यान वाहनांची रहदारी असलेल्या शहराच्या प्रमुख चौकात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ- विजापूर राष्ट्रीय महामार्ग वर मोहोळ शहरात कुरुल रस्त्यानजीक भारतीय स्टेट बँकेचे पेट्रो कंपनीचे एटीएम मशीन आहे. दरम्यान बुधवार दि.८ जून रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशिन मध्ये प्रवेश करून समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर हिरव्या रंगाचा कलर मारून कॅमेरा बंद केला.
सोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा पत्रा कट करून एटीएम मशीन मधील ५०० रुपये दराच्या ४८७२ नोटा, १०० रुपये दराच्या १९२५ नोटा असा एकूण २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व मशीनची सुमारे एक लाख ५० हजार रुपयांची तोडफोड असा एकूण २७ लाख ७७ हजार रुपये नुकसान केल्या बाबतची फिर्याद हिताची पेमेंट कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असणारे किरण संजय लांडगे (वय-३०) रा. सैनिकनगर सोलापूर यांनी दिली. त्यानुसार अज्ञात चोरटयाच्या विरोधामध्ये मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत.
दरम्यान मोहोळ शहरातीलच पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँके जवळील एटीएम मशीन फोडण्यासाठीही येथील सीसीटीव्ही कॅमेरा वर कलर स्प्रे मारण्यात आला होता. दरम्यान याठिकाणी चोरट्याना चाहूल लागल्याने इथून त्यांनी काढता पाय घेतला.