¤ बॉक्सिंगमध्ये येण्यास झरीनला करावा लागला विरोधाचा सामना
नवी दिल्ली : खेळाडू म्हणून मी भारताचे प्रतिनिधीत्व करते, कोणत्याही समुदायाचे प्रतिनिधीत्व करत नाही, माझ्यासाठी हिंदू-मुस्लिम वाद महत्त्वाचा नाही, असे विश्व चॅम्पियन बॉक्सर निकहत जरीनने म्हटले आहे. गेल्या महिन्यात निकहत फ्लाईवेट इवेंटमध्ये विजयी ठरली होती. त्यानंतर तिच्या धार्मिक पार्श्वभूमीवर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सोशल मीडियावर तिची चर्चा केली जात होती… त्यावर निकहतने प्रतिक्रिया दिली आहे. Represents a country, not a specific community – Zareen Nikhat opposes boxing
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारी महिला बॉक्सर निकहत झरीनने कोणत्याही विशिष्ट समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाही, असे म्हणत देशासाठी खेळत असल्याचे रोखठोक मत मांडले. कठोर मेहनत आणि कारकीर्दीपेक्षा झरीनला धर्मावरून अधोरेखित केले जाते. मात्र, आपण धर्माला महत्त्व देत नाही, असे म्हणत २५ वर्षीय झरीनने विरोधकांवर हल्ला चढवला.
रुढीवादी धर्माशी, समाजाशी संबंध असल्यामुळे झरीनला कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात सामाजिक पूर्वग्रहांना सामोरे जावे लागले होते. तसेच महिला म्हणून बॉक्सिंगमध्ये येण्यास तिला विरोधाचा सामना करावा लागला होता. मात्र सर्व विरोधांना पुरून उरत झरीनने महिला बॉक्सिंगमध्ये आपली विशिष्ट अशी ओळख निर्माण केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/561279038883163/
एक खेळाडू या नात्याने भारताचे प्रतिनिधित्व करते. माझ्यासाठी धर्म महत्त्वाचा नाही आहे. कोणत्याही समुदायचे प्रतिनिधित्व करत नाही. देशासाठी खेळते आणि देशासाठी पदक मिळवल्यामुळे समाधानी आहे, असे झरीन भारतीय महिला प्रेस कोरच्या वतीने आयोजित वार्तालाप सोहळ्यात म्हणाली. मानसिक दबाव हाताळण्यात भारतीय बॉक्सर कमी पडत असल्याकडे झरीरने लक्ष वेधले. भारतीय बॉक्सरांत प्रतिभा ठासून भरली आहे.
भारतीय बाॅक्सिंगपटू निकहत झरीनने महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत आजवर सर्वाधिक सुवर्णपदके भारताची अनुभवी बॉक्सिंगपटू मेरी कोमने जिंकली आहेत. मेरीनंतर निकहतने भारतीय बॉक्सिंगच्या नवीन सुवर्णाध्यायाला सुरुवात केली आहे. तेलंगणाच्या निकहतचा जागतिक बॉक्सिंग प्रवास थक्क करणारा आहे.
तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या निकहतने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे तिने कसून सराव केला. २०११मध्ये तुर्कस्थानात झालेल्या कनिष्ठ आणि युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकत आपली छाप पाडली.
२०११ मध्येच एका आंतरविद्यापीठ सामन्यादरम्यान तिच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे जवळपास तिला वर्षभर बॉक्सिंगपासून दूर रहावे लागले. यानंतरही अनेक अडथळ्यांचा सामना करत तिने आपला प्रवास सुरु ठेवला. २०१४ मध्ये युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले. २०१५ च्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. २०१९ आणि २०२२ मध्ये तिने स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण आणि थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561845638826503/