Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरात एक कोटी ३१ लाखाच्या गुटख्याची होळी

Food and Drug Administration

Surajya Digital by Surajya Digital
June 15, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापुरात एक कोटी ३१ लाखाच्या गुटख्याची होळी
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : गेल्या तीन महिन्यांमध्ये विविध १७ ठिकाणी धाडी टाकून जप्त करण्यात आलेल्या १ कोटी ३१ लाख १ हजार ८४६ रुपयांच्या गुटखा, पान मसाला व सुगंधीत सुपारीची अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने बोरामणी येथील कीर्ती ॲग्रोटेक कंपनीच्या आवारामध्ये मोकळ्या जागेत होळी केली. Holi of Gutkha worth Rs 1.31 crore in Solapur Food and Drug Administration

अन्न व औषध प्रशासनाने जप्‍त केलेला सुमारे 1 कोटी 31 लाख रुपयाचा गुटखा, सुगंधी सुपारीचा साठा काल मंगळवारी (ता. 14) जाळून नष्ट केला. अन्न-औषध विभाग व पोलिसांनी 17 ठिकाणी संयुक्त कारवाई करून हा साठा जप्त केला होता, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले.

यावेळी सोलापूर तालुका पोलिस स्टेशनचे पर्यवेक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रज्ञा सुरसे, श्रीमती रेणुका पाटील, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर व श्रीमती नंदिनी हिरेमठ हे उपस्थित होते.

 

□ माणुसकी दाखवणं पडलं महागात, मोबाईल, रोकडसह दुचाकीही चोरून नेली

सोलापूर : एका अनोळखी तरुणाने वैयक्तिक अडचण दाखवून वृध्दाकडे मदत मागितली. मदत दिल्यानंतर तरुणाने त्या वृद्धाची दुचाकी, मोबाइल व रोख रक्कम घेऊन पळ काढला.

नजीर मोहम्मद इक्बाल शेख (वय ७१, रा. ओंकार हौसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर १, दुसरा मजला होटगी रोड) यांनी फिर्याद दिली. शनिवारी (११ जून) दुपारी एक वाजता मार्कंडेय रुग्णालयाजवळीत साई मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला सिगारेट ओढत बसले होते. तेवढ्यात २५ ते ३० वर्षे वयाचा एक तरुण तेथे आला. तुमचे नाव इक्बाल सर आहे ना, मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही बऱ्याच वेळा मला मदत केली आहे, असे सांगून विश्वास संपादन केला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

शेख यांच्या दुचाकीमागे बसून तो पाथरुट चौक येथे घेऊन गेला. तेथे गर्दीत दुचाकी थांबवून माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे असू सांगून पत्नीला फोन लावण्याचा बहाणा करून शेख यांचा मोबाइल काढून घेतला. इतकेच नाही तसेच खूपच गरज आहे म्हणून सांगून पाच हजार रुपये सुध्दा काढून घेतले.

यानंतर तुम्ही इथेच थांबा, मी बायकोला घेऊन येतो, असे सांगून वृध्द व्यक्तीची दुचाकी, मोबाइल आणि रोख रक्कम घेऊन तो तरुण पसार झाला. अशा प्रकारे फसवणूक झाल्याची फिर्याद शेख यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. यावरून अज्ञात तरुणाविरुध्द गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

□ जास्तीच्या सामानासाठी रेल्वे आकारणार दंड, प्रवाशांमधून नाराजी

सोलापूर – रेल्वेने प्रवास करीत असताना सोबत सामान बाळगण्याच्या नियम व अटींमध्ये आता बरेच बदल करण्यात आले आहेत. विहित मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे सामान सोबत बाळगल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. रेल्वेने यासंदर्भात नवे नियम लागू केले आहेत. याबाबत सोलापूर रेल्वे विभागाच्या वाणिज्य विभागाने सांगितले.

 

रेल्वेने प्रवास करताना अनेकांकडे बॅगा दिसतात. कोणी गावांहून धान्याची पोती तर कोणी फळांच्या पेट्या इतकेच काय तर गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायने, फटाके आदी वस्तू घेऊन अनेकजण प्रवास करीत असतात. आता मात्र रेल्वेतून सामान नेण्यावर मर्यादा आणली आहे. नियमापेक्षा जास्त सामान नेल्यास पाचपट दंड भरावा लागणार आहे. तसेच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेने याबाबत नुकतेच नियम जारी केले आहेत. स्लीपर क्लाससाठी प्रवास करताना प्रवाशांना ४० किलो सामानासह प्रवास करता येणार आहे. फर्स्ट क्लास एसीमधून प्रवास करताना प्रवाशाला तब्बल ७० किलोपर्यंत सामान नेण्याची सूट देण्यात आली आहे. रेल्वेमधून प्रवास करताना अतिरिक्त सामानासाठी आता पैसे मोजावे लागणार असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

 

Tags: #Holi #Gutkha #worth #crore #Solapur #Food #Drug #Administration#सोलापूर #एककोटी #लाख #गुटखा #होळी #अन्न #औषध #प्रशासन
Previous Post

Zareen Nikhat विशिष्ट समुदायाचे नव्हे देशाचे प्रतिनिधित्व करते – झरीन निकहत

Next Post

नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697