सोलापूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील सावकाराने दिलेल्या मानसिक त्रासास कंटाळून पंढरपुरातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर सावकारीचा प्रश्न ऐरणीवर आला. Fed up with the mental anguish of moneylender, the youth committed suicide
लहू दिगांबर शिंगाडे (वय २८ रा. देशमुख मठामागे, भक्तीमार्ग पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. लहूने बुधवारी (15) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत या तरुणाच्या पत्नीने काल गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहू दिगांबर शिंगाडे यांनी संभाजी मरिबा काळे व आंबिका संभाजी काळे (दोघे रा. पंढरपूर) यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ते रुपये परतफेड करुन देखील आणखी ४० हजार रुपये व्याजाचे दे म्हणून सतत काळे यांनी लहू शिंगाडे यांना तगादा लावला.
पुढे शिवीगाळ, धमकावण्यापर्यत विषय गेला. लहू यांना त्रास दिल्याने व त्या त्रासापोटीच मानसिक तणावात लहू यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यामुळे लहू यांना आत्महत्या करण्यास, त्याचे मरणास संभाजी संभाजी काळे यांनीच प्रवृत्त केल्याची तक्रार मोनाली लहू शिंगाडे (वय २२, रा. भक्तीमार्ग, बाबासाहेब देशमुख मठामागे, पंढरपूर) यांनी दिली आहे. पुढील तपास सपोनि निलेश बागाव करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563247605352973/
□ प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांना अटक
सोलापूर – तक्रारी अर्जाची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यास अर्वाच्य शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केल्याची घटना वटवटे (ता.मोहोळ) येथील जकराया शुगर कारखाना जवळ घडली. या प्रकरणात कामतीच्या पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
यासंदर्भात संजय ताराचंद ननावरे या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. कारखाना परिसरातील शेतात दूषित पाणी येत असल्याची तक्रार नारायण गुंड यांनी केली होती. त्या तक्रारी अर्जाचे पाहणी करणसाठी ननवरे हे मंगळवारी (ता .14) दुपारच्या सुमारास गेले होते.
त्यावेळी नारायण गुंड त्यांचा भाऊ हरी शिवाजी गुंड आणि लहु पंढरी जाधव (सर्व रा.येणकी ता.मोहोळ) या तिघांनी त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून कामात अडथळा केला होता. पुढील तपास सहाय्यक फौजदार दुधे हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563193842025016/