□ अग्निपथ योजना : ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासाठी त्याच ठिकाणी आहेत. हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. आज फादर्स डे आहे. जगाने मान्य केले आहे. त्यासाठी आपल्याला या फादर्स डेचं महत्त्व आहे. शिवसेना हिंदुत्वाचा बाप का आहे ते आदित्य ठाकरे अयोध्येला गेल्यानंतर सगळ्या देशाने पाहिले, असेही ते म्हणाले. Balasaheb Thackeray is the father of Hindutva, controversial statement of Sanjay Raut on Shiv Sena anniversary Father’s Day Agneepath Yojana
शिवसेनेचा आज 56 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत राजकारण करत आहे. भूमिपुत्रांची भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष निर्माण केल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. अब तक 56 और भी आगे जाएंगे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या 56 वा वर्धापन दिना निमित्ताने आज (19 जून) पवई येथील हॉटेल वेस्ट इन हा सोहळा पार पडला. यात उपस्थित आमदार आणि शिवसैंनिकांना संबोधिक करताना राऊतांनी केंद्र सरकाच्या अग्निवीर, विधान परिषद निवडणूक, हिंदुत्व, राणा दाम्पत्य, भाजप, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी मुद्यांवरून तोफ डागली.
संजय राऊत म्हणाले, “आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन आहे. 56 वर्षापूर्वी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ठिणगी या मुंबईत टाकली. या ठिणगीच्या 56 वर्षभरात जो वनवा पेटलेला आहे. त्या वनव्याचा आज वर्धापन दिन आहे. आज महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थिती आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा व्यासपीठावर आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पन केले आहे. आणि शिवसेना प्रमुखांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माहिती दिली की बाबा आज ‘फादर्स डे’ आहे. म्हणजे वडिलांना जागतिक स्तरावर यूनोनी ठरविले आहे. आज फादर्स डे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
56 वर्षाचा झंझावात!!! pic.twitter.com/wGfjMHfKHm
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 19, 2022
□ बाळासाहेब म्हणायचे देशाला बाप नाही
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोण आहेत आले. बाळासाहेब नेहमी म्हणायचे जेव्हा फादर ऑफ नेशन जेव्हा राष्ट्रपती उल्लेख यांचा तेव्हा ते म्हणायचे की, देशाला बाप नाही. नेहमी बोलायचे या देशाला बाप नाही. आज फादर्स डे निमित्ताने मी आज सांगू इच्छितो शिवसेना प्रमुख फादर्स ऑफ हिंदुत्व. हिंदुत्वाचा बाप जर या कोणी जगात असेल ते आपले बाळासाहेब ठाकरे म्हणून आजच्या फादर्स डेचे महत्व आहे.
आमच्यासाठी फादर्स डेचे महत्व काय आहे. हिंदुत्वाचा आमचा बाप या देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक जण ज्याच्या मनात हिंदुत्व आहे. ज्याच्या रोमा रोमात हिंदुत्व आहे. तो प्रत्येक दिन माननीय बाळासाहेब ठाकरे आपला बापच मान तो आणि बाप एकच असतो. हिंदुत्वाचे बाप कसे आहोत.” असे राऊत म्हणाले.
□ पगले हमारी बादशाही तो खानदानी है
“मी इतकेच सांगेन शिवसेनेचा 56 वाढदिवस आहे. मला सकाळी नेहमी प्रमाणे पत्रकारांनी विचारले. 56 वा वाढदिवस आहे मी म्हटले होय, हा वाढदिवस नाही हा तुफानाचा वाढदिवस आहे. आणि अब तक छप्पन अजून पुढे बरच आहे. हे आमच्या राजकीय विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. राजकारणात काही लोकांना फार घमेंड आली आहे. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या पार पडल्या आहे. ठिक आहे एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे. पण मी इतकेच सांगतो एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले असे नाही, महाराष्ट्र जिंकले असे नाही. या राज्याची सूत्रे ही शिवसेनेकडेच असतील. आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील फार घमेंड करू नका. अगदी स्पष्ट सांगायचे तेरा घमेंड चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है आणि ती राहणार ते दिसेल. या बादशाहीला नख लावण्याची हिम्मत अजून कोणामध्ये पैदा झालेली नाही. कोणी किती हवेत तलवार बाजी करू द्या,” असे राऊत म्हणाले.
□ ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात
तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात? सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार. सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहित होतं आतापर्यंत. पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत.
चार वर्षांचं कंत्राट.. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्या राज्याने घेतला नाही. या देशात तुघलक होता, त्यानेसुद्धा असा निर्णय घेतला नसेल. देशाचं रक्षण कोणी करायचं हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत,” अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवर टीका केली.देशाचं रक्षण कुणी करायचे हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हाती सत्ता आहे. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही, असा टोला केंद्र सरकारला लगावला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/564375665240167/