सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. विषारी औषध प्राशन करून त्यांनी जीव संपवले. या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. ही घटना आज सोमवारी दुपारी समोर आली. Maharashtra trembled! 9 members of the same family commit suicide, doctor, teacher killed in Miraj
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ इथे एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केलीय. माणिक यल्लाप्पा होनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावांसह घरातील लोकांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान, मृतांमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा सामावेश आहे.
डॉक्टर दाम्पत्याच्या घरात 6 मृतदेह तर दुसऱ्या घरात 3 असे एकूण 9 मृतदेह आढळून आले आहेत. त्या सामूहिक आत्महत्येचा घटनेमुळे संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये डॉक्टर माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49) शिक्षक पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), मुलगी संगीता पोपट वनमोरे (वय 48), शिक्षकाची पत्नी पत्नी अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), पत्नी रेखा माणिक वनमोरे (वय 45), मुलगा आदित्य माणिक वनमोरे (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि आई अक्काताई वनमोरे (वय 72) या 9 जणांचा समावेश आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565257141818686/
म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथे दुसरे घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात 6 जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह आढळलेत. एकाच कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेने संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेला आहे. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही आता शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यावरून आत्महत्या कि हत्या याबाबत उलगडा होण्यास मदत होणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565078858503181/