मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार आहे. गुप्तचर यंत्रणा फेल झाल्यानेच हा बाका प्रसंग महाविकास आघाडी सरकारवर आला आहे. Action against 40 MLAs’ personal secretary officers, commandos, constables
दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना त्या-त्या जिल्ह्यातील आमदारांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
राज्य सरकार या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील गुप्तचर यंत्रणा फेल झाल्याचा फटका आता जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांना बसणार आहे. या सर्वांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.
शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी राज्यातील गुप्तचर यंत्रणेचे अपयश समोर आले होते. त्यानंतर गुप्तचर यंत्रणा प्रभावशाली न केल्यामुळे शिवसेनेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून समोर आले. भाजप नेते वारंवार ठाकरे सरकार कोसळणार असल्याचे जाहीर वक्तव्य करत असतांनाही राज्यातील इंटेलिजन्स यंत्रणा गाफील राहिली. त्यानंतर कारवाईच्या मोडमध्ये सरकार आला आहे.
अनेक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सूरतला गेले. पण, याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार आहे. आमदाराचे अधिकारी आणि पोलिसांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती दिली नाही. यामुळे आता राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे.
विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना निकाल लागल्यानंतर पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबई सूरत रस्त्याने गुजरातपर्यंत पोहचले. पालघर जिल्ह्यातील तलासरीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा एकनाथ शिंदे यांना होती. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे आणि समर्थक 20 पेक्षा जास्त आमदार सूरतला रवाला झाले. इतकी मोठी घडामोडी घडत असताना याची कल्पना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली नव्हती.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती, अशी देखील माहिती आहे. इंटेलिजन्सचां रिपोर्ट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/567681821576218/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपचा पाठिंबा, शिंदेंनी स्वतः दिली कबुली, भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर
मुंबई : गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात गुरुवारी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची बंडखोर आमदारांच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला. ‘ते नॅशनल पार्टी आहे. ते महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे आणि तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे, असं शिंदे यात म्हणताना दिसतात. त्यामुळे यामागे भाजपच असल्याचं बोललं जातंय.
शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवार यांना असलेली ऑफरच शिंदे यांना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला आणि मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात गुरुवारी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची बंडखोर आमदारांच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलीय. त्याची माहिती देण्यासाठी शिंदेच्या कार्यालयातून काही फोटो आणि व्हीडिओ जारी करण्यात आले आहेत. त्यात शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर ते आमादारांचे आभार मानत आहेत. त्यावेळी जे काय सुखदुःख आहे ते आपल्या सर्वांच एकच आहे. काही असेल त्याला आपण एकजुटीने सामोरं जाऊ. विजय आपल्याच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईत गुरुवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेतही याच व्हीडिओचा दाखला देत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या या बंडामागे भाजपच असल्याचा दावा नामोल्लेख करता केलं आहे. बैठकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नाव घेतलं नाही पण भाजपचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांचा त्यांना कसा पाठिंबा आहे हे पटवून सांगितलं आहे. पाठिंबा देणारी नॅशनल पार्टी आहे. ते महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे आणि तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठचंही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल,” असं एकनाथ शिंदे गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात त्यांच्या गोटातल्या आमदारांना संबोधित करताना म्हटल्याचे वृत्त आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/567635111580889/