सोलापूर – रेल्वे स्थानक परिसरातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून लाच घेणा-या फौजदारास अटक केलीय. ते सदर बझार पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तेथील खासगी वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी केली होती. या प्रकारामुळे शहर पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. Faujdar Gajaad court police custody while accepting bribe of Rs 12,000 in railway station area
रेल्वे स्थानक परिसरातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना सदर बझार पोलीस ठाण्याचा फौजदार प्रशांत सूर्यकांत क्षीरसागर (वय ३४) याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला. ही कारवाई शुक्रवारी (ता. 24) सायंकाळच्या सुमारास स्टेशन पोलीस चौकी येथे करण्यात आली. आज त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार तर्फे ॲड. गंगाधर रामपुरे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. निलेश जोशी यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा पुढील तपास अँटिकरप्शनचे निरीक्षक चंद्रकांत कोळी हे करीत आहेत.
फौजदार प्रशांत क्षीरसागर हा सदर बझार पोलीस ठाणे अंकित स्टेशन चौकी येथे कार्यरत आहे. पोलिस चौकीच्या परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या नेहमीच थांबलेल्या असतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी दरमहा १३ हजार रुपये लाच द्यावी, अशी मागणी फौजदार क्षीरसागर यांनी केली होती.
तडजोडीने १२ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान प्रवासी वाहतुक संदर्भातील तक्रारदार यांनी लाचलुचपत कार्यालयाशी संपर्क साधून फौजदाराविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन पोलीस चौकी परिसरात सापळा रचला होता.
सायंकाळच्या सुमारास तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेत असताना पथकातील पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. आणि त्याच पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई अँटीकरप्शनचे निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, प्रमोद पकाले, उमेश पवार आणि शाम सुरवसे आदींनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/568549531489447/
□ पेट्रोल ने पेटवून घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर – घरातील किरकोळ भांडणातून एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना काल शुक्रवारी (ता.24) सकाळी वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथे घडली.
किरण रविंद्र गायकवाड (वय २८) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतला होता. त्यात तो भाजून गंभीर जखमी झाला. त्याला वडाळा येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे .
□ नशेत हातावर ब्लेडने मारून घेतले
शेळगी परिसरातील आदर्श नगरात राहणाऱ्या रफिक अल्लाबक्ष बागवान (वय २६) या तरुणांनी दारूच्या नशेत स्वतः डाव्या हातावर ब्लेडने वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता.23) रात्रीच्या सुमारास घडली. त्याला हलीम (भाऊ) यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जोडभावी पेठ पोलिसात याची नोंद झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/567959321548468/