सोलापूर – उधारीवर घेतलेल्या मोबाईलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तीक्ष्ण शस्त्र आणि पाईपने केलेल्या मारहाणीत मोबाईल दुकानाच्या मालकासह दोघ गंभीर जखमी झाले. यात आठजणांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. Akluj: Assault on mobile shop due to borrowing, crime against eight people Hattur Gram Panchayat office locked
ही घटना अकलूज येथील एस.एस मोबाईल दुकानासमोर गुरुवारी (ता. 23) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात अकलूजच्या पोलिसांनी विठ्ठल येवले (रा.माळीनगर) याच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात मोबाईल दुकानाचा चालक सलमान मुबारक शेख (वय२५ रा. काजीगल्ली,अकलूज) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून विठ्ठल येवले आणि त्याच्या साथीदारांनी मिळून त्यांना आणि त्यांच्या चुलत भाऊ मोहसीन हिरालाल शेख यांना मारहाण केली.असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. हवालदार कोळी पुढील तपास करीत आहेत.
□ येवती येथे घरफोडी; १ लाख ३५ हजारांचे दागिने लंपास
सोलापूर – येवती (ता.मोहोळ) येथे एका महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ११ हजार रुपये रोख आणि २८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा १ लाख ३५ हजाराचा ऐवज पळविला. ही चोरी शुक्रवारी (ता. 24) पहाटेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात इंदुमती औदुंबर हारगुडे( रा. येवती) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फौजदार खापरे पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/568625041481896/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा
सोनके (ता.पंढरपूर) येथे चारित्र्याच्या संशयावरून काठीने केलेल्या मारहाणीत हसीना शाहरुख मुलाणी (वय २६ रा.सोनके) ही विवाहिता जखमी झाली. ही घटना गुरुवारी (ता.23) सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीणच्या पोलीसांनी तिचा पती शाहरुख नजीर मुलाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी सुमारास त्याने दारूच्या नशेत पत्नीला काठीने मारहाण केली होती. अशी नोंद पोलिसात झाली आहे हवालदार मुंडे पुढील तपास करीत आहेत .
https://www.facebook.com/109399567404448/posts/568586321485768/