□ एकनाथ शिंदेंकडून पूरग्रस्तासाठी 51 लाखाची मदत जाहीर
मुंबई : एकनाथ शिंदे मुंबईत येणार आहेत. 30 जूनला आपण मुंबईत येत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच यावेळी आपण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार, दर्शन करणार, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्हाला कुणी रोखू शकणार नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान शिंदे आज बंडखोर आमदारांसह गोव्यासाठी रवाना होणार आहेत. या ठिकाणी 70 रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. Shinde group will come to Mumbai tomorrow, will go to Balasaheb’s memorial – Eknath Shinde Kamakhya Devi Mandir Darshan
अखेर उद्या (30 जून) गुवाहाटीतून सर्व शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत. ‘आम्हाला कुणी रोखू शकणार नाहीत, आमच्याजवळ बहुमत आहे, आम्ही उद्या मुंबईत येत आहोत’, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. ‘आमच्याजवळ दोन तृतीयांश बहुमत आहे, आमच्याजवळ 50 आमदार आहेत, आमचाच विजय होणार, आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही’, असेही ते म्हणाले.
आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून जाहीर केलं.
या मदतीसाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचे आभार मानले आहेत.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार बहुमत चाचणी प्रक्रियेसाठी गुवाहाटीहून गोवामार्गे उद्या मुंबईत येणार आहेत. उद्या गुरुवारी (ता. 30) सकाळी 11 वाजता बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.
दरम्यान बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात राज्यपालांच्या आदेशाविरोधात महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुमत चाचणीसंदर्भात सर्व कागदपत्रं सादर केलीत तर आम्ही सुनावणी घेऊ शकू, असं न्यायालयाने सांगितलं. 4 वाजेपर्यंत कागदपत्रं दाखल केल्यास 5 वाजता सुनावणी होऊ शकते. महाविकास आघाडीला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी 5 तास आहेत.
बहुमताच्या चाचणीसाठी उद्या आम्ही सर्व आमदारांना घेऊन मुंबईत पोहोचणार असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या नागरिकांच्या सुखसमाधानासाठी प्रार्थना केल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/571131897897877/
□ राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची रिघ
मुंबई : दिल्लीवरून आज देवेंद्र फडणवीस मुंबईत पोहोचले आहेत. दिल्लीत त्यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत येताच त्यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या नेत्यांनी धाव घेतली आहे. प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि धनंजय महाडिक सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. सरकार स्थापन करण्याबाबत सागर बंगल्यावरील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आदेश दिले आहेत. दरम्यान कालचं भाजपकडून मविआ अल्पमतात आहे, त्यांनी बहुमत सिद्ध करावे अशी विनंती केली होती. आज लगेच ती विनंती मान्य करून राज्यपालांनी हे आदेश दिले आहेत.
राज्यपाल यांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. याविरोधात सेनेचे वकील पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले असून राज्यपालांनी घटनेच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप होत आहे. एकनाथ शिंदे गटाने वेगळा गट स्थापन केल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आम्ही शिवसेनेतच असल्याचं ते म्हणत आहेत. त्यांनी जाहीरपणे सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. त्यामुळे सरकार अल्पमतात कसं आलं, असा प्रश्न आहे. आणि सरकार अल्पमतात आलंच नसेल, तर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याची घोषणा कोणत्या आधारावर केली, असा सवाल ठाकरे सरकारकडून केला जात आहे.
सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आल्यास किंवा विश्वासदर्शक ठराव आल्यास विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देतात. त्याविरोधात न्यायालयात गेल्यानंतर बहुमत शक्य तितक्या लवकर सिद्ध करण्याचा आदेश न्यायालय देते. घोडेबाजार होऊ नये, अशी न्यायालयाची भूमिका असते. त्यामुळे, कमीत कमी वेळ ठेवला जातो. महाराष्ट्रातील घडामोडींबाबतही सर्वोच्च न्यायालयात या भूमिकेपेक्षा वेगळं काही घडेल, असं दिसत नाही.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार मंत्र्यांची संख्या ५० च्या घरात गेली आहे. त्यानंतर शिवसेना आणि बंडखोर गटात सर्वोच्च न्यायालयात लढाई रंगली. याच काळात या गटासोबत सत्तावाटपाच्या सूत्रावर चर्चा केलेल्या भाजपने आता काही पावले पुढे टाकण्यास सुरवात केल्याचे बोलले जात आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाबींत शिंदे गट फसणार नाही, या हिशेबाने केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. शिवसेना, बंडखोरांमधील तिढा लवकर कधीही सुटण्याची आशा धरून भाजपच्या गोटात वेगवान घडामोडी घडत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर दोन दिवसापासून नेत्यांची रीघ लागली आहे.
फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्यात बैठका झाल्या आहेत. त्याआधी प्रदेश कार्यालयातही अनेक नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. शिवसेना, बंडखोरांमध्ये घमासान सुरू असतानाही भाजप नेते मात्र, उघडपणे काही न बोलता बैठकांवर भर देत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या खेळींवर नजर ठेवत, शिंदे गटाला वेळी सावरून नव्या समीकरणांची तंतोतंत जुळणी करण्यात येत आहे. सध्या शिवसेना, बंडखोर आमदारांत सत्तेवरून वाद दिसत असला, तरीही त्यात भाजपने अद्यापही उघडपणे उडी घेतलेली नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/570678041276596/