□ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पडिक इमारतीत महिलेचा खून
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सकाळी रजिया सलीम शेख (वय ७२ रा. नविन घरकुल कुंभारी) या महिलेचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मयताचा नातू शाहनवाज मेहबूब शेख (वय २२ रा.नवीन घरकुल कुंभारी) याला शिताफीने अटक केली. त्याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज मंगळवारी दिला. Grandmother killed her grandson; Grandson arrested; Sunawali Police Cell Solapur Collectorate Premises
आपल्या पत्नीला शिवीगाळ करून वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने चिडून जाऊन शाहनवाज शेख याने आपल्या आजीचा छताचे कौलार आणि स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शनिवार (दि.२५ जून) रोजी सकाळी त्याने खून करून तो पसार झाला होता. तसेच आजीचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो अंत्यसंस्काराची तयारी करीत होता.
जिल्हा परिषद सोलापूर येथील आवक-जावक कार्यालयाच्या बाजूस एक महिला मृत अवस्थेत पडली आहे. त्या अनुषंगाने सदर बझार पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठिकाणी पोहोचले असता, तेथे असलेल्या एका पडक्या खोलीत एक महिला काहीही हालचाल न करता जमीनीवर पडलेली दिसली.
मृत महिलेच्या शरिरावर मारहाणीच्या जखमा आणि प्रेत फुगलेले होते. त्या ठिकाणी मयत महिलेची मुलगी शबाना शेख ही आली व तिने ती महिला तिची आई असून,तिचे नाव रजिया सलीम शेख असल्याचे आणि ती महिला दोन दिवसापासून घरातून बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितली. शिवाय ती सेतू कार्यालयात कमिशन एजंट म्हणून काम करीत असल्याची माहिती दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
हा प्रकार खूनाचा दिसून आल्याने पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणे पोलीसांसमोर आव्हान होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त बापू बांगर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीकोनातून मार्गदर्शन करून आरोपीला शोधण्यासाठी रवाना केले.
गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनिल दोरगे आणि स.निरिक्षक क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या बातमीनुसार एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. त्या संशयिताकडे अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने आपले नाव शहानवाज मेहबूब शेख असे सांगितले.
मयत रजिया शेख ही त्याची आजी असून ती सतत त्याच्या पत्नीस शिवीगाळ करत होती व तिचे चारित्र्य चांगले नसल्याबाबत वारंवार लोकांना सांगत होती. शिवाय भांडण करून पत्नीला नाहक त्रास देत होती. म्हणून तिचा भोसकून खून केल्याची कबूली त्याने दिली. आरोपी शाहनवाज शेख याचे लग्न ६ महिन्यापूर्वी झाले असून तो चहाटपरीवर काम करत असल्याचे समजले.
सदर बाजारच्या पोलिसांनी शाहनवाज शेख याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने त्याला २ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत.
□ प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वनराज मंडलिकसह एकाची निर्दोष मुक्तता
सोलापूर : प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वनराज मंडलिकसह एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
तोहिद अजिज शेरदी (वय-२४,रा. जोडभावी) याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वनराज बळीराम मंडलिक (वय-२१) आकाश परशुराम कानकुर्ती (वय-२४,दोघे रा. जोडभावी पेठ) यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की,तोहीद व आरोपी यांच्यामध्ये टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये वाद झाला होता. त्यावरून दि.२६ जुन २०२० रोजी तोहीद अजीज शेरदी व त्याचा मित्र शुभमसिंग चव्हाण असे दोघे जण मिळून मोटारसायकलीवरून कोंतम चौकाकडून त्यांच्या घरी निघाले होते.
जात असताना वनराज मंडलिक याने त्यांना अडवून तोहीद याची गच्ची पकडून काही एक न बोलता तुला खल्लास करतो असे म्हणून त्याच्या जवळील चाकूने हल्ला केला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. अशा आशयाची फिर्याद तोहीद शेरदी याने जोडभावी पेठ पोलीसात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारतर्फे अॅड एम. एम. देशपांडे यांनी तर आरोपीतर्फे अँड.मिलिंद थोबडे, अँड. आर. आर. बापट, अँड.सतिश शेटे, अँड.निशांत लोंढे,अँड.अमित सावळगी यांनी काम पाहिले.