मुंबई : राज्यात लवकरच 7 हजार 231 पदांची पोलिस भरती केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. यासंबंधीचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत, असेही ते म्हणाले. लवकरच या संबंधीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. Police recruitment for 7 thousand 231 posts in the state of Maharashtra, the process will be completed soon Dilip Walse-Patil Home Ministry
एकीकडे एकनाथ शिंदे यांचे बँड चालू असताना राज्य सरकार धोक्यात आलेले आहे. अशा परिस्थितीतही मुख्यमंत्र्यांनी आपले काम सुरूच ठेवण्याचे निश्चित केले आहे. राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7 हजार 231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.
पोलीस दलात भरती प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाणार आहे. भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच हजार, तर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार 231 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार असून उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्य सरकारने पोलीस शिपाई संवर्गातील 7 हजार 231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता या भरतीसाठी ओएमआर (ऑप्शनल मार्क रेकहनायझेन) आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया लांबली होती. राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या दुरुस्तीचा फायदा पोलीस दलास होणार असून त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.
□ असे असणार गुण आणि वे॓ळ
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5कि.मी. धावणे (50गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल.
तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR पद्धतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.
□ ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पोलिसांना 25 लाखात घर
#house #घर
#police #पोलीस #ठाकरे #सरकार #निर्णय
ठाकरे सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार BDD चाळीतील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर नावावर करून देण्यात आले. आता ती घरं 50 लाख ऐवजी 25 लाख रुपयात देण्यात येतील, असं आव्हाड यांनी सांगितलं.