सोलापूर : कोळगाव येथे सुमारे पाच वर्षाच्या मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तो मुलगा आपली उंची वाढवण्यासाठी ॲगलला लोंबकळत होता. त्यावेळेस ही घटना घडली. Five-year-old Chimukalya dies of snake bite while hanging to increase height Solapur
अर्णव सचिन माने असे त्याचे नाव आहे. त्याला दोन बहिणी आहेत. गुरुवारी (ता. 30) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली ही घटना घडली. माने कुटुंब कोळगाव येथे राहतात. अर्णव हा मामाच्या मुलांबरोबर घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता. खेळत असताना तो शेडमधील अँगललला लोंबकळत होता. तेव्हा वरील बाजूला साप होता हे त्याला दिसले नाही. मात्र तो ज्या अँगलला लोंबकळत होता त्याच्याच वरील बाजूला असलेल्या सापाने त्याला दंश केला.
त्यानंतर त्याने हा प्रकार आजोबाला सांगितले. त्याला तत्काळ करमाळा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला अकलूज येथे नेले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे कोळगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव जेव्हा लोंबकळत होता तेव्हा त्याचे आजोबा त्याला लोंबकळू नको असे सांगत होते.
मात्र तेव्हा मला उंची वाढवायची आहे. म्हणून लोंबकळत असल्याचे त्याने सांगितले. हेच त्याचे शेवटचे शब्द असल्याचे सांगितले जात आहे. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील सचिन व त्यांच्या कुटुंबियानी खूप प्रयत्न केले मात्र उपयोग झाला नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/573145297696537/
□ सराईत गुन्हेगार निखिल कांबळे स्थानबध्द
सोलापूर : सराईत गुन्हेगार नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे याला एनपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. विजयपूर रोडवरील सोरेगाव परिसरातील आदित्य नगरात राहणाऱ्या नितीन उर्फ निखील मारूती कांबळे याने आतापर्यंत ३२ गुन्हे केले आहे.
त्यातील पाच गुन्हे अदखलपात्र आहेत.दोनवेळा कारवाई होऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने बुधवारी पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई केली. त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली आहे.या बाबत अधिक माहिती अशी कि,अनेक वर्षांपासून निखील कांबळे हा विजयपूर रोड परिसरात स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांमध्ये भीती व दहशत माजवत होता.
बाहुबली नगर, नम्रता सोसायटी,विजयपूर रोड,डफरीन चौक, लकी चौक, हुतात्मा स्मृती मंदिर,सोरेगाव,जुनी मिल कंपाउंड,भिम नगर, यामिनी नगर,आदित्य नगर,नक्षत्र नगर, कंबर तलाव, नालंदा नगर, सुंदरम नगर, संत रोहितदास चौक, वसंत नगर,कोर्णाक नगर, जानकी नगर, जुळे सोलापूर, थोबडे वस्ती, जुना देगाव नाका, पोलिस अधीक्षक कार्यालय परिसर,बेन्नूर नगर, रामलाल चौक,ए.जी.पाटील कॉलेज परिसरात त्याची दहशत होती.पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळेला स्थानबध्द करण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/572888087722258/