नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल महाग झाले असतानाच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्येही मोठी वाढ झाली आहे. या बुधवारी जारी झालेल्या नवीन दरानुसार सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाले आहे. 50 रुपये दरवाढ झाल्यामुळे गॅस सिलेंडरचा दर 1058 ते 1068 रुपयांवर गेला आहे. Shock! Gas cylinders will go up by Rs 244 a year, GST on foodgrains will go up
वर्षभरातील ही आठवी दरवाढ आहे. गेल्या 1 वर्षात जवळपास 244 रुपयांनी गॅस महाग झाला आहे. त्यामुळे दिल्लीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी दरवाढीचे चटके बसत आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सततच्या दरवाढीमुळे वर्षभरात गॅस सिलेंडर तब्बल 244 रुपयांनी महागला आहे.
घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी, 5 किलो वजनाच्या गॅसच्या किमतीत 18 रुपयांनी तर, व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो गॅस सिलेंडरच्या दरात साडेआठ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे घरातील स्वयंपाकाचे बजेट कोलमडले आहे.
वर्षभरात जून 2021 पासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडच्या दरामध्ये 244 रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये मार्च 2022 पासून चार वेळा दरवाढ झाली. 22 मार्चला 50 रुपयांनी दर वाढविले, पुन्हा 7 मे रोजी 50 रुपये, 19 मे रोजी 3.50 रुपये आणि आज 50 रुपयांनी सिलेंडर महागला.
देशातील प्रमुख शहरांतील दर पाहता मुंबई – 1 हजार 52.50 दिल्ली – 1 हजार 53, चेन्नई – 1 हजार 68.50, पुणे – 1 हजार 55.50 , कोलकाता – 1 हजार 79 असा दर आहे. पुणे, पिंपरी – चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी येथे सीएनजी तीन रुपयांनी महागला असून प्रति किलो दर 85 रुपये झाला आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने आज या दरवाढीची घोषणा केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/576436424034091/
‘आत्ममग्न’ सरकार आणि ‘चिंतामग्न’ जनता अशी आपल्या देशाची सध्याची अवस्था असल्याची टीका शिवसेनेनं काल झालेल्या गॅसदरवाढीसंदर्भात चिंता व्यक्त करताना केली आहे. राज्यामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त करण्यासंदर्भातील संकेत दिल्यानंतर लगेच गॅसचे दर वाढल्याचा संदर्भही शिवसेनेनं जोडला आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकारण करण्यात भाजपा मग्न असून सर्वसामान्य मात्र महागाईमध्ये भरडला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय.
“पुन्हा जीएसटीचे जे भूत दरवाढीच्या रूपाने सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसले आहे, तेही उतरायची शक्यता नाही. जीएसटीमुळे केंद्र सरकारची तिजोरी मागील काही महिन्यांपासून ‘अब्जच्या अब्ज उड्डाणे’ घेत आहे. पण सामान्य माणसाच्या खिशातील उरलेसुरले किडुकमिडुकदेखील हे जीएसटीचे भूत ओरबाडून घेत आहे, त्याचे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.
अशातच आता दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी आणखी वाढवला आहे. डेअरी उत्पादने महागणार आहेत. येत्या 18 जुलैपासून पाच टक्के जीएसटी लागणार आहे. अन्नधान्य आणि डेअरी उत्पादनावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे. जीएसटी कौन्सिलच्या 28 आणि 29 जून रोजी झालेल्या बैठकीत काही वस्तूंवरील करात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशी करण्यात आलेले जीएसटीचे दर 18 जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/576433757367691/