● विजयी झालेले गटनिहाय उमेदवार आणि मते
सोलापूर / पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर घडले आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर १८ वर्षांनंतर सत्तांतर झाले. डीव्हीपी उद्योग समूहाचे तथा धाराधिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील गटाची सत्ता आली आहे. दोन दिवसात कामगारांना कामावर बोलावणार , अशी अभिजित पाटील यांनी मोठी घोषणा केल्याचे वृत्त आहे. Abhijit Patil’s undisputed dominance over Vitthal Sugar Factory: Vijay Pandharpur won 20 out of 21 seats Solapur
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकाच्या निकालामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.
□ अभिजीत पाटील यांचे निविर्वाद वर्चस्व : २१ पैकी २० जागांवर विजय
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भगीरथ व काळे गटाचे १८ वर्षाची सत्ता उलथवून टाकत अभिजीत पाटील यांनी २१ पैकी २० जागा जिकंत निविर्वाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. या निवडणुकीत वारसा सांगणाऱ्या युवराज पाटील व भगीरथ भालके या दोघांचाही धक्कादायक पराभव झाला आहे. अभिजीत पाटील यांच्या रुपाने एका युवा नेतृत्वाचा उदय झाला असून येणाऱ्या सर्व निवडणुका पुर्ण ताकतीने लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.
या निवडणुकीत एकूण २३००२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये अभिजीत पाटील पॅनेलचे सर्वच उमेदवार एकाच दुसरा गट वगळता १ नंबरवर राहीले. तुंगत, मेंढापूर गटात युवराज पाटील यांची आघाडी होती. तर सरकोली, कासेगाव गटात भगीरथ भालके दोन नंबरवर राहीले. यामध्ये तब्बल ४५२२ मते अवैध मते ठरली याचा फटका नक्की कोणाला बसणार याची मथंन करण्यात पराभूत पॅनेल गुंतला होता. तर विजयानंतर अभिजीत पाटील यांनी पंढरपुर शहरातील प्रमुख मार्गावरुन विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/576661274011606/
□ विजयी झालेले उमेदवार
* भाळवणी गट – धनंजय उत्तम काळे (८३२७ मते, वाडीकुरोली), साहेबराव श्रीरंग नागणे (८३१५ मते, रा. उपरी), कालिदास रघुनाथ पाटील (८१६५ मते, रा. कौठाळी),
* करकंब गट – नवनाथ अंकुश नाईकनवरे ( ८५०० मते, रा. पटवर्धन कुरोली), दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे (७९३० मते, रा. जळोली), कालिदास शंकर साळुंखे ( ७८७७ मते, रा. खेडभोसे),
*मेंढापूर गट – जनक माणिक भोसले (८३०१ मते, रा. रोपळे बुद्रुक), दिनकर आदिनाथ चव्हाण (८०४० मते, रा. आढीव),
* तुंगत गट – अभिजीत धनंजय पाटील (८७४६ मते, रा. देगाव), प्रविण विक्रम कोळेकर (६८९३ मते, रा. गुरसाळे),
* सरकोली गट – संभाजी ज्ञानोबा भोसले (८४४१ मते, रा. सरकोली), सचिन सोपान वाघाटे (७८७५ मते, रा. आंबे),
* कासेगाव गट – सुरेश बाबा भुसे (८५२८ मते, रा. कासेगाव), बाळासाहेब चिंतामणी हाके (८२५५ मते, रा. कोर्टी), प्रेमलता बब्रुवाहन रोंगे (८१६२ मते, रा. कराड रोड गेंड वस्ती, पंढरपूर),
* अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघ – सिताराम तायाप्पा गवळी (८६४३ मते, रा. कासेगाव),
* इतर मागासवर्ग मतदारसंघ – अशोक ज्ञानोबा जाधव (८६५४ मते, रा. फुलचिंचोली)
*महिला प्रतिनीधी मतरास संघ – कलावती महादेव खटके (८४३२ मते, रा. भोसे), सविता विठ्ठल रणदिवे (८१४६ मते, रा. तुंगत),
* विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्ग मतदारसंघ – सिध्देश्वर शंकर बंडगर (८६८४ मते, रा. होळे)
*उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था* – समाधान वसंतराव काळे (६४ मते, रा. वाडीकुरोली)
———————
साखर कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून २००० मतांच्या आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांची गेल्या १८ वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते.
विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते भूमिगत झाले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपुरात आल्यानंतर त्यांनीच भगिरथ भालके नॉटरिचेबल असल्याचे म्हटले होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी ८ वाजल्यापासून पंढरपूर शासकीय गोदामात सुरू झाली होती. रात्री १० वाजेपर्यंत अभिजित पाटील युवराज पाटील यांच्या गटात कट्टे की टक्कर असल्याचे दिसून आले. चेअरमन भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे कल हाती आले आहेत.
धाराधिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या पॅनलने भाळवणी आणि करकंब गटातून काल आघाडी घेतली होती. तर मेंढापूर आणि तुंगत गटातून संचालक युवराज पाटील यांचे पॅनल पुढे असल्याचे चित्र होते. अभिजित पाटील आणि युवराज पाटील यांच्यात थोडक्या मताची आघाडी असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.
या निवडणुकीत सत्ताधारी भालके – काळे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता कालच रात्रीपासूनच व्यक्त होत आहे. अजून कासेगाव आणि सरकोली गटाची मतमोजणी बाकी आहे. भालके गटाचे संस्था मतदारसंघात समाधान काळे यांचा विजय झाला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/576724730671927/