अकोला : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलंय. येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात आणून त्यावर बंदी घालण्यात येईल असं गडकरींनी म्हटलंय. अकोला येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भात तयार होणारे बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे, असंही ते म्हणाले. Petrol to be banned in next 5 years – Nitin Gadkari Akola
अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 36 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी बोलत होते. देशात इंधनाच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे इंधनाचे दर दोन रुपयांनी जरी कमी झाले तरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना, येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावर बंदी घालण्यात येईल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, आता विदर्भात तयार होणारे बायो इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते 70 रुपये प्रति किलो दराने विकता येते. येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल, असे गडकरी म्हणाले. तसेच केवळ गहू, तांदूळ, मका लावून कोणताही शेतकरी आपले भविष्य बदलू शकत नाही. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा प्रदाता बनण्याची गरज आहे तेदेखील ते म्हणाले.
इथेनॉलच्या निर्णयामुळे देशाचे 20,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील. विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना असून त्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठ बरेच काही करू शकते असेदेखील नितीन गडकरी म्हणाले आहेत.
□ जनतेला मोठा झटका; वीज दरात वाढ
#सुराज्यडिजिटल #surajyadigital #झटका #वीजदर #वाढ #electricity #झटका
राज्य वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांनी वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजूरी दिली आहे. परिणामी दरवाढ होणार असल्याची चर्चा आहे. इंधन समायोजन आकार म्हणजे वीज खरेदी खर्चात वाढ होईल. जून महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. महावितरणच्या वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारामुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया मोजावा लागणार आहे.