सोलापूर : पंढरपूर सांगोला मार्गावरील कासेगाव फाटा वनीकरण जवळ किया सेलटॉस ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पाईपला जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन वारकरी जागीच ठार झाले तर इतर दोघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (ता. 10 जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. Two accidents in Solapur: Two Warakaris killed on the spot, 11 injured in another accident
जखमींना उपचारासाठी पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याची माहिती आहे. राजू संभाजी शिधोळकर व परशुराम संभाजी जवरूचे (दोघे रा. अनगुळ जि. बेळगाव )असे मयतांची नावे असून अभिजित हुंबरे व गितेश पोकशेकर असे दोघा गंभीर जखमींची नावे आहेत. मयत व जखमी हे सर्व आषाढी एकादशी निमित्त किया सेलटॉस या गाडीतून बेळगावहून पंढरपूरकडे येत होते.
दरम्यान ते पंढरपूर सांगोला रोडवर कासेगाव फाटा वनीकरण जवळ आले असता त्याठिकाणी रस्त्यात एका खड्यासारखा उतार आहे, वेगात उतार समजला नाही. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या सिमेंट पाईपवर जाऊन आदळली. गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला.
□ खासगी ट्रॅव्हल्सचे टायर फुटून अपघात
सोलापूर : नाशिकहून सोलापूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचे पुढील टायर फुटून ट्रॅव्हल पलटी झाली या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये लोकांची प्रकृती गंभीर असून त्या जखमींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
कल्पना सुभाष जैन, दर्शना जैन, प्रफुल चव्हाण, जय पटेल, सुनील हगलुरे अशी जखमींची नावे समोर आली आहेत. आज सोमवारी (ता. 11 जुलै ) सकाळी सात साडे सातच्या दरम्यान सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ जवळ यावली फाट्याला हा अपघात झाला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579439747067092/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नाशिक ते सोलापूर राजयोग ट्रॅव्हल्स एम एच 15 FV 5000 या ट्रॅव्हलमध्ये ३० प्रवासी होते. त्यापैकी ११ जण जखमी झाले. अपघातात अपघाताची माहिती मिळतात 108 क्रमांक ॲम्बुलन्सच्या व्यवस्थापकांनी तीन ॲम्बुलन्स घटनास्थळी पाठवल्या.
१०८ क्रमांक ॲम्बुलन्स डॉक्टर आणि पायलट यांनी जखमींना तातडीने बाहेर काढत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयाकडे रवाना केले.
□ मालवाहतूक ट्रॉली अंगावर पडल्याने १५ वर्षाचा मुलगा जागीच ठार
सोलापूर – मंडपाची साहित्य नेणारी मालवाहतूक ट्रॉली उलटल्याने त्याच्याखाली सापडून १५ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात शनिवारी (ता. 9 जुलै) सकाळच्या सुमारास विनायक नगर येथील ओमशांती बिअर शॉपी जवळ घडला.
गणेश अंबादास मादगुंडी (वय १५ रा. लक्ष्मीनगर, नक्कावस्ती, एमआयडीसी रोड) असे मयताचे नाव आहे. तो शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मंडपाचे साहित्य नेणाऱ्या ट्रॉलीमध्ये बसून विनायक नगराच्या दिशेने जात होता. ओमशांती बियर शॉपीजवळ ट्रॉली उलटल्याने तो साहित्याचा खाली सापडून गंभीर जखमी झाला होता. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला.
मयत गणेश मादगुंडी हा ९ वी इयत्तेत शिकत होता. त्याच्या पश्चात आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील अंबादास मादगुंडी यांचे दोन महिन्यापूर्वी आजाराने निधन झाले होते. त्याची आई विडी कामगार आहे. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579381567072910/