Thursday, March 23, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Ashoka stambh नव्या अशोकस्तंभाचा शिल्पकार एक मराठी माणूस, अभ्यास करून बनवले राष्ट्रचिन्ह

Ashoka stambh The sculptor of the new Ashoka pillar is a Marathi man, a national emblem made by study

Surajya Digital by Surajya Digital
July 13, 2022
in Hot News, देश - विदेश
0
Ashoka stambh नव्या अशोकस्तंभाचा शिल्पकार एक मराठी माणूस, अभ्यास करून बनवले राष्ट्रचिन्ह
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या अशोकस्तंभाची निर्मिती औरंगाबादच्या व्यक्तीनं केली आहे. सुनील देवरे असं त्यांचं नाव आहे. अनेक शिल्प आणि वास्तू त्यांनी घडवल्या आहेत. दरम्यान या अशोक स्तंभावर असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून वाद निर्माण झाला आहे. सिंहाची भावमुद्रा हिंसक आणि आक्रमक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.  Ashoka stambh The sculptor of the new Ashoka pillar is a Marathi man, a national emblem made by study

राष्ट्रचिन्ह बनवणारे सुनील देवरे हे 49 वर्षांचे आहेत. जेजे जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांना शिल्पकलेमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. सुनील देवरे यांनी यापूर्वी अजिंठा एलोरा व्हिजिटर सेंटर येथे अजिंठा एलोरा लेण्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. ज्याची किंमत 125 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

या विषयी वादंग निर्माण होत असतानाच नव्या अशोक स्तंभात कोणताही बदल केलेला नाही, असे स्पष्टीकरण त्याची रचना करणारे शिल्पकार सुनील देवरे यांनी दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 11) संसद भवनाच्या इमारतीत नव्या अशोक स्तंभाचे अनावरण करताच वादाला तोंड फुटले. राष्ट्रचिन्हाशी छेडछाड करून त्यात बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातील सिंह सारनाथमध्ये असलेल्या स्तंभापेक्षा वेगळे आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

या छायाचित्रात मोदींच्या मागील प्रतिकृतीमध्ये दिसणारे सिंह अधिक आक्रमक दिसत असून ते सारनाथ येथील मूळ अशोक स्तंभावरील शिल्पापेक्षा खूप वेगळे दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच, या प्रतिकृतीमध्ये कुठेही सत्यमेव जयते हे मूळ मानचिन्हावर असणारं वाक्य देखील नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

केंद्र सरकारवर अशोक स्तंभाबाबत टीकेची झोड उठत असताना दुसरीकडे सरकारचीही बाजू काही समाज माध्यमांवर वापरकर्त्यांनी मांडली आहे. अशोक स्तंभावरील फोटो फारच जवळून घेण्यात आल्याने तो आक्रमक वाटत असावा, असे सांगितले जात आहे. नवीन संसदेच्या इमारतीवर असलेला अशोक स्तंभ 20 फूट उंच असून, 9500 किलो वजनाचा आहे. हे अशोक स्तंभ तांब्याचे आहे.

 

नव्या अशोक स्तंभाची रचना करणारे शिल्पकार सुनील देवरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. देवरे म्हणाले, त्यांनी बनवलेली मूर्ती आणि मूळ रचना यात काही किरकोळ फरक असू शकतो. नवी मूर्ती 9.5 टन वजनाची ब्राँझची बनविण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रतीक नव्या अशोकस्तंभाच्या चारित्र्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 

मूळ राष्ट्रीय चिन्ह 7 फूट उंच आहे, तर नवीन प्रतीक सुमारे 7 मीटर (सुमारे 21 फूट) उंच आहे. व्हायरल होत असलेल्या राष्ट्रचिन्हाच्या चिन्हाचे फोटो मूर्तीच्या खालच्या कोनातून घेण्यात आले आहे आणि विविध अँगलने पाहिल्यास त्याचे स्वरूप बदललेले दिसते.

संसदेच्या नवीन इमारतीत लावण्यात आलेल्या राष्ट्रीय चिन्हाचा वाद वाढत चालला आहे. याप्रकरणी विरोधक सातत्याने सरकार आणि पंतप्रधानांबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर राष्ट्रीय चिन्हाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच या आरोपांमागे अनेक कायदेशीर आणि ऐतिहासिक युक्तिवादही देण्यात आले आहेत. दुसरीकडे, भाजपने विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले असून सरकारने राष्ट्रचिन्हात कोणताही बदल केलेला नाही, असे प्रतिक्रियेत म्हटले आहे.

 

“मी नीट अभ्यास करून राष्ट्रचिन्ह बनवले आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या वतीने मला अशोक स्तंभ प्रतीक बनवण्याचे काम देण्यात आले होते आणि मला सरकारकडून याबाबत कोणतीही सूचना मिळाली नव्हती.”

– सुनील देवरे , शिल्पकार

Tags: #Ashokastambh #sculptor #new #Ashokapillar #Marathi #man #national #emblem #made #bystudy
Previous Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 15 जुलैपासून बुस्टर डोस मोफत

Next Post

आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक

आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697