नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनावरील बुस्टर डोससंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून 18 वर्षांवरील सर्वांना मोफत बुस्टर डोस दिला जाणार आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. Big decision of Modi government, booster dose free from July 15 Anurag Thakur
भारतातील लोकांवर आर्थिक भार पडू नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 15 जुलैपासून 75 दिवसांपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. आतापर्यंत देशात 199 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या बुस्टर डोससंबंधीचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
📡देखें लाइव📡
📢केंद्रीय मंत्रिमंडल द्वारा लिए गए निर्णयों पर केंद्रीय मंत्री श्री @ianuragthakur जी की प्रेस वार्ता @MIB_India @ddnews @airnewsalerts @PBNS_India #CabinetDecisions https://t.co/wFtrYZfIL7
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) July 13, 2022
मार्च २०२२ पासून कोरोना महामारी हा देशासमोरचा मोठा चिंतेचा विषय आहे. भारताने आतापर्यंत १९९ कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीकरण केले आहे. हा आकडा जवळपास १९९ कोटी ६० हजार आतापर्यंत लसीकरण झाले आहे. आता १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवसांपर्यंत १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. याआधी बूस्टर डोससाठी नागरिकांकडून शुल्क घेतले जात होते”, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/580985963579137/
“याआधी फ्रंटलाइन वर्कर्स, कोव्हिड वॉरिअर्स होते किंवा ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी हा बुस्टर डोस मोफत दिला जात होता. मात्र आता १८ वर्षांवरील सर्वांना हा डोस मोफत दिला जाणार आहे. सर्व सरकारी केंद्रांवर हा डोस उपलब्ध असेल”, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले.
या विशेष मोहिमेत 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. त्यापैकी 1 टक्क्यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 160 दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस मिळाला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दोन्ही डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंडाची पातळी सुमारे सहा महिन्यांनी कमी होत आहे. अशा परिस्थितीत बूस्टर किंवा सावधगिरीचा डोस दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने 75 दिवसांसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत 18 ते 59 वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रांवर कोरोनाचा मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱ्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारशीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580940290250371/