मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांच्या दावणीला शिवसैनिक कधीही बांधला जाणार नाही. ज्या-ज्या वेळी शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवारांचाच हात होता, असा आरोप केसरकर यांनी केला. नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्या फुटीमागे शरद पवारांचा हात होता. हे त्यांनी आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलं होतं, असंही केसरकर म्हणाले.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत पहिल्यांदाच इतका मोठा बंड पाहायला मिळाला. एकनाथ शिंदेंपूर्वी नारायण राणे, छगन भुजबळ व राज ठाकरे देखील बंड करत शिवसेनेतून बाहेर पडले होते. तर यामागे देखील शरद पवार असल्याचा दावा दीपक केसरकरांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक केसरकर यांनी आज दिल्लीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडायला शरद पवारांनी मदत केली होती. तसेच राज ठाकरेंच्या पाठिशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते. छगन भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन आले होते, असा मोठा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. मी राष्ट्रवादीत होतो त्यावेळी मला विश्वासात घेऊन सांगायचे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तूस्थिती आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.
मातोश्री कधीही सिल्वर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा असं शरद पवारांना वाटणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीच मान्य नव्हतं. शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही, असंही केसकर म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्याचं मार्गदर्शन मिळत असल्याची टीका दीपक केसरकरांनी केली आहे.
शरद पवार यांनी काल मंगळवारी (ता. 12) शिंदे गटाला अनुसरून जनतेला गृहीत धरू नये, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले की, जनतेला शरद पवारांनी देखील धरू नये. महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत होतं, असंही ते म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580844016926665/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
माजी मुख्यमंत्री नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्या फुटीमागे शरद पवारांचा हात होता. हे त्यांनी आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलं होतं, असा दावा केसरकर यांनी केला. ते म्हणाले होते, राणेंना बाहेर पडण्यासाठी आपण मदत केली. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवली नाही. भुजबळांचं सर्वश्रूत आहे. तर राज ठाकरे आणि पवार यांच्याविषयी सर्वांना माहित असल्याचा दावा केसरकर यांनी केला.
अडीच वर्षात राष्ट्रवादीला टॉनिक मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेत्यांकडून तसे जाहीरपणे सूतोवाचही केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या पालखीचे भोई होणे शिवसैनिकांना पटणार आहे का, याचा विचार शिवसैनिकांनी करावा असे आवाहन केसरकरांनी केला आहे.
□ राज ठाकरेंच्या पाठिशीही पवारांचे आशीर्वाद
शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर वेले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580816030262797/