मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुका किंवा विधानसभा निवडणुकांसाठी मनसे आणि भाजपची युती होणार का असा प्रश्न केला जात आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसाचं राज ठाकरे यांच्या घरी औक्षण करत स्वागत करण्यात आलं. Devendra Fadnavis met Raj Thackeray, welcomed him and welcomed him
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होण्याची शक्यता माध्यमांमध्ये व्यक्त करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रस्ताव राज ठाकरेंना दिल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र राज यांनी याविषयी खुलासा केला आहे. अमित ठाकरे मंत्री होणार, असे वृत्त देणाऱ्या माध्यमांवर त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच अमित ठाकरे मंत्री होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. आता फडणवीसच ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. सत्ता स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पत्राला पत्राद्वारे नाहीतर त्यांच्या घरी जाऊन उत्तर देईन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी राज ठाकरे यांच्या पक्षातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या वतीने मतदान केलं होतं. कल्याण ग्रामीण येथील राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्याआधी देखील मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता. त्याबदल्यात महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येणार का, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मनसेला जवळ करून भाजप उद्धव ठाकरेंना आव्हान देणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहेत.
आज शुक्रवारी दोन्ही नेत्यांची भेट झाली. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीसांचे औक्षण केले. तर राज यांनी भगवे उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने विचारपूस करण्यासाठी भेट घेणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते. या भेटीनंतर त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मनसे नेते राज ठाकरे यांची आज मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.’
https://www.facebook.com/109399567404448/posts/582382026772864/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जवळपास दीड ते २ तास या दोन्ही नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे उपस्थित होते. राज-फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे-भाजपा युतीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आलं. त्यात भविष्यकाळात राजकारणात काहीही होऊ शकतं अशाप्रकारे सूचक संकेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत.
भेटीनंतर बाळा नांदगावरकर म्हणाले की, मध्यंतरी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं होतं. ते पत्र सगळ्यांनाच आवडलं होतं. त्या पत्रानंतर फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले होते. त्यानंतर आज ते सदिच्छा भेट घेण्यासाठी शिवतीर्थवर आले होते. १५-२० मिनिटं आम्ही दोन्ही नेत्यांसोबत होतो. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कळू शकेल. मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आम्ही माध्यमांकडूनच ऐकत असल्याचे म्हटले.
सध्या राष्ट्रपती निवडणुका आहेत त्यात आमचं एकमत आहे. भाजपाला मदत करण्याची भूमिका मनसेने घेतली. आता त्याबदल्यात काय करायचे हे त्यांच्या पक्षाचं धोरण असेल. कुठल्याही मोबदल्यासाठी राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. आता मनसेला सकारात्मक वातावरण आहे. लोकांमध्ये सगळ्याच पक्षांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे. आमचा एकला चलो रे नारा आज, उद्याही राहणार आहेत. पण भविष्यात नक्की काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही असंही बाळा नांदगावकरांनी सांगितले.
राजकारणात काहीही अशक्य आहे. पुढील निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही. महाविकास आघाडी बनेल असंही वाटलं नव्हतं. त्यानंतर आता अशाप्रकारे सरकार बनेल असंही वाटलं नाही. लोकं सगळं काही बघत आहे. जनतेचा कौल डावलून आधीच सरकार बनलं होतं. येणारा काळ मनसेसाठी सुवर्णकाळ ठरेल असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/582295143448219/
□ 106 वाला 1 च्या भेटीला – सुप्रिया सुळे
आज उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थ या बंगल्यावर भेट होणार आहे. यावर ‘106 आमदार असलेला, 1 आमदार असलेल्याची भेट घेत आहे, ठाकरे म्हंटल कि स्वाभिमान असं समीकरण आहे. त्यामुळे ठाकरे झुकत नाहीत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. बंड पुकारल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा अनेकदा उल्लेख करणाऱ्या शिवसैनिकांना माईक खेचल्याने स्वाभिमान जागा झाला नाही का? ” असा प्रश्न सुळे यांनी केला आहे.