मुंबई : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित महिलेने मेलद्वारे राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर पडायला भिती आहे, म्हणून मी मेलद्वारे तक्रार करत आहे असं या मेलमध्ये म्हटले आहे. महिला आयोगाने मदत करण्याची विनंती महिलेने केली आहे. देशमुख यांचा एक विवादित विडिओ व्हायरल झाला होता. Complaint filed against Srikant Deshmukh, Solapur Women’s Commission
संबंधित महिलेने देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर पडायला भीती वाटत आहे, असे म्हणत पिडीतेने मेलद्वारे महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर आता आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
या पाठवलेल्या मेलमध्ये, महिला आयोगाने माझ्यासहीनिशीची तक्रार दखल पात्र गुन्हा म्हणून नोंद करण्याबाबत संबंधित पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावेत वा माझी तक्रार नोंदवण्यासाठी मला मदत करावी असे म्हटले आहे. सदर संशयित आरोपी हा आर्थिक व राजकीयदृष्ट्या बलाढ्य असल्यामुळे मला भीतीपोटी बाहेर जाऊन फिर्याद देणे शक्य न झाल्याने सदरची फिर्याद इमेलद्वारे दाखल करत आहे, असेही म्हटले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/583202790024121/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/583189300025470/
चार दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहे. देशमुख हे अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेले आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे.
हे वाक्य ऐकताच देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित देशमुख यांनी त्या महिलेवर हनीट्रॅपच्या आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या खळबळीनंतर देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. वातावरण पाहता प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी काही तासात राजीनामा मंजूर केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला असून पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
□ खासदार राहुल शेवाळे देखील हनी ट्रॅपमध्ये अडकले
दरम्यान, सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे हनी ट्रॅप प्रकरण ताजे असतानाच शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राहुल शेवाळेंनी महिलेविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. तीन महिन्यापूर्वी एका महिलेने शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. त्याच महिलेच्या विरोधात शेवाळेंनी ही तक्रार दाखल केली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तक्रारीतील महिलेने शेवाळे यांना अनेकदा पत्र लिहून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र शेवाळे यांनी आपल्याला खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/582934726717594/