पंढरपूर :– कोरोना नंतर भरलेल्या आषाढी वारीमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस ५ कोटी ७० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दोन वर्षा नंतर वारी भरल्यामुळे २०१९ च्या तुलनेत मंदिर समितीस १ कोटी २९ लाख रूपये अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. 5 Crore 70 Lakhs to Shree Vitthal Rukmini Mandir Samiti saibaba shirdi
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने २०२२ सालातील आषाढी वारी काळातील दोन आठवड्याचे उत्पन्न प्रसिध्द केले आहे. त्यानुसार यंदा समितीस विविध माध्यमातून एकूण ५ कोटी ६९ लाख ९६ हजार ५०२ रूपये मिळाले आहे. तर २०१९ साली ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रूपये उत्पन्न मिळाले होते. दोन्हीची तुलना केली तरी यंदा १ कोटी २९ लाख रूपये उत्पन्न वाढल्याचे दिसत आहे.
परंतु दोन्ही उत्पन्नाची तुलना केली तर बहुतांश विभागात देणगी घटल्याचे चित्र आहे. मंदिर समितीच्या वेदांत, व्हिडीओकॉन, नवीन भक्त निवास आदी चार भक्त निवासाचे उत्पन्न २०१९ च्या तुलनेत घटले आहे.
दरम्यान लाडू विक्री केंद्रावर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनाने ते बंद ठेवण्याची सूचना केली होती. यामुळे समितीस २०१९ च्या तुलनेत ४३ लाख रूपयांचा फटका बसला. २०१९ साली ६७ लाख ९८ हजार उत्पन्न मिळाले तर २०२२ साली लाडू विक्रीची दरवाढ करून ही केवळ २४ लाख २७ हजार उत्पन्न मिळाले. परंतु राजगिरा लाडूची विक्री वाढली आहे. २०१९ साली ७ लाख ७२ हजार रूपये तर यंदा १० लाखाहून अधिक रूपये यामधून प्राप्त झाले आहेत.
□ श्री विठ्ठल रूक्मिणीचे नित्योपचार सुरू ; प्रक्षाळ पूजा संपन्न
पंढरपूर – आषाढी वारीमध्ये बंद असणारे श्री विठ्ठल व रूक्मिणीचे नित्योपचार आज सोमवारी प्रक्षाळपूजे नंतर पुर्ववत सुरू झाले. भाविकांना दर्शन देण्यासाठी यात्रेत अखंड उभा असलेल्या देवाच्या चरणांना लिंबू साखर लावून व औषधी काढा दाखवून शिणवटा काढण्यात आला.
आषाढी व कार्तिकी वारीमध्ये देव भक्तांना दर्शन देण्यासाठी चोवीस तास उभा असतात अशी अख्यायिका आहे. यामुळेच यात्रा काळात देवाचा पलंग काढण्याची परंपरा आहे. यात्रेच्या पंधरा दिवसात देवाचा पलंग काढल्यामुळे दैनंदिन नित्योपचार बंद असतात. यात्रे नंतर प्रक्षाळपूजे पासून सदर सर्व नित्योपचार पुन्हा सुरू केले जातात. त्यानुसार सोमवारी सकाळी देवाच्या शयनगृहात पलंग ठेवण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/584578136553253/
आजच्या दिवशी अखंड उभ्या असलेल्या देवाच्या चरणाचा शिणवटा काढण्यासाठी स्थानिकांसह भाविक लिंबू साखर लावतात. मात्र झीज होवू नये म्हणून मागील पंधरा वर्षा पासून चरणांवर चांदीचे कवच ठेवले जाते. यालाच भाविकांनी लिंबू साखर लावली. दुपारी बारा वाजता प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी विठ्ठलास पहिले गरम पाण्याचे स्नान घातले.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुसरे गरम पाण्याचे स्नान घालून श्री विठ्ठल व रूक्मिणीस दुधाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर देवास आकर्षक दागिने परिधान करण्यात आले होते. तर रात्री शेजारतीस विविध २७ वनस्पती पासून बनविलेला औषधी काढा देवास दाखविला जातो. प्रक्षाळपूजे पासून देवाचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी नित्योपचार पुन्हा सुरू होतात.
प्रक्षाळपूजे निमित्त केलेली ङ्गुलांची सजावट व देवाला परिधान केलेले दागिने पाहण्यासाठी भाविकांनी सायंकाळी मंदिरात गर्दी केली होती.
□ गुरुपौर्णिमेला शिर्डीत 5.12 कोटींचे दान
#shirdisai #shirdisaibaba #Shirdi #sai #साई #साईबाबा #shirdiwalesaibaba
गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर यंदा शिर्डीत गुरूपौर्णिमेचा उत्सव जोरात साजरा झाला. यावेळी गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून 5 कोटी 12 लाख 408 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. यात इतर बारा देशामधील 19 लाख 80 हजार 94 रुपये परकीय चलन आहे. दरवर्षी देश विदेशातून भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. गेले काही काळ दर्शन बंद असल्यामुळे यंदा दर्शनाला लोकांची खुप गर्दी होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/584553686555698/