अक्कलकोट : नागरिकांना विविध सेवा पुरविणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांवर प्रतिबंध करणे, सुरक्षा पुरविणे या सर्व शीर्षकाखाली तपासणी होऊन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील प्रथम वळसंग पोलीस ठाण्यास आयएसो स्मार्ट पोलीसींग प्रमाणपत्रामध्ये गुणांकन प्राप्त झाले आहे. ISO Smart Rating of Walsang Police Station Solapur Akkalkot
पोलीस ठाणेचे नियमित कामकाजाचे स्वरूपात सुबध्दता, स्पष्टता व सुबकरीत्या वळसंग पोलीस ठाणेचे कामकाज केले जात असल्याने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांनी स्मार्ट पोलीस ठाणे साकारण्यासाठी परिश्रम घेतल्याचे सांगितले जात आहे.
क्राईम विभागाकडील गुन्हे अभिलेख अद्यावत ठेवून कालबाह्य अभिलेख नाश करण्यात आलेला आहे,तसेच पोलीस ठाणेत असलेल्या अभिलेखाची रचना ही नंबरनुसार लावल्याने तो सुसंगत व शोधण्यासाठी सोयीस्कर करण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे मुद्देमाल विभागाकडील गुन्ह्यात जप्त मुद्देमालाचे वर्गीकरण करून त्याची ठेवण व्यवस्थितरित्या करून सुखरूपरित्या ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक मुद्देमाल रूढीप्रमाणे वरिष्ठांचे परवानगीने नाश केलेला आहे. बेवारस 67 वाहनांचा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लिलाव केलेला आहे. गोपनीय विभाग व बारनिशी विभागाकडील फाईल, रजिस्टर अद्यावत ठेवून नंबरप्रमाणे लावण्यात आलेला आहे. त्यामुळे फाईल व रजिस्टर शोधणे सोपे झाले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
वळसंग पोलीस ठाणेची इमारतीस रंगरंगोटीचे कामकाज करून सर्व विभाग दर्शविणारे निळ्या व लाल रंगाचे फलक लावण्यात आले. पोलीस ठाणेच्या हद्द खुणा याचपद्धतीने बोर्ड तयार करून लावण्यात आलेल्या आहेत. पोलीस ठाणे आवारात 400 मीटर वॉकींग ट्रॅक व ऑक्सीपार्क तयार करून सदरचे ट्रॅकभोवती विविध प्रकारची झाडे लावून भोजनासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. गावपातळीवरील किरकोळ भांडण तंटे मिटविण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस ठाणेत आपत्तीजनक परिस्थितीत हाताळणी करण्यासाठी सर्व बाबींची उपाययोजना करून माहे जुन महिन्यात सोअर संस्थेचे प्रतिनिधी समीर रूपलग व त्यांच्या सहकारी सेजल रूपलग यांच्याकडून तपासणी करून घेतली. त्यामध्ये नागरिकांना विविध सेवा पुरविणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांवर प्रतिबंध करणे, सुरक्षा पुरविणे या सर्व शिर्षकाखाली तपासणी झाली.
यात 15 जुन 2022 रोजी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील प्रथम वळसंग पोलीस ठाणेस आयएसो स्मार्ट पोलीसींग प्रमाणपत्रामध्ये A+ गुणांकण प्राप्त झाले. पुढील तपासणीची तारीख 15 जुन 2023 देण्यात आली आहे. या प्रमाणपत्राची वैधता 15 जून 2025 पर्यंत आहे.
या कामगिरीसाठी वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले , सपोफौ म्हाळप्पा सुरवसे, सपोफौ श्रीनिवास दासरी, मपोहेकॉ श्वेता फुलारी, पोहेकॉ राजकुमार निंबाळे, पोहेकॉ फिरोज इनामदार, पोना रामदास मालचे, पोकॉ प्रसाद मांढरे, पोकॉ कपिल काटकर, पोकों दिपक गाढवे, पोकॉ लक्ष्मण काळजे , मपोकों वर्षा डोलारे आदींनी परिश्रम घेतले.