मुंबई : दौंडचे आमदार राहुल कुल यांना मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळवून देण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. कुल यांच्याकडे त्याने यासाठी 100 कोटी रूपयांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या आमदारांना मंत्रिपदासाठी शंभर कोटींची मागणी करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 100 crore demand from BJP MLAs for ministerial posts; Rahul Kool arrested four people from Hotel Oberoi
या प्रकरणी मुंबईच्या ऑबेरॉय हॉटेलात सापळा रचून पोलीसांनी चौघांना अटक केली आहे. आमदार जयकुमार गोरेंसोबतही हाच प्रकार घडला. याबाबत कुल यांनी घडलेला प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला. सध्या राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रीमंडळ विस्तार बाकी आहे. याचा फायदा घेत 4 भामट्यांनी 3 आमदारांकडे मंत्री करतो म्हणून चक्क 100 कोटींची मागणी केली आहे.
आमदारांच्या तक्रारीनंतर या चौघांना पोलिसांनी पकडले आहे. आम्ही दिल्लीहून आलो आहोत, तिथे तुमचा बायोडेटा मागितला आहे, असे या 4 जणांनी आमदारांना सांगितले होते. पोलिसांना याची तक्रार मिळताच त्यांनी ही कारवाई केली. चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी रिजाय शेख म्हणजे रियाजभाई यानेच आमदार राहुल कुल यांच्याकडे शंभर कोटींची मागणी केली होती. त्यापैकी 18 कोटी रुपये देण्याची तयारी राहुल कुल यांनी दर्शवल्यानंतर रियाजभाई पैसे घेण्यासाठी आला होता.
तिथे पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. रिजाय शेख म्हणजे रियाजभाई यानेच आमदार राहुल कुल यांच्याकडे शंभर कोटींची मागणी केली होती. त्यापैकी 18 कोटी रुपये देण्याची तयारी राहुल कुल यांनी दर्शवल्यानंतर रियाजभाई पैसे घेण्यासाठी आला होता. तिथे पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. राहुल कुल यांचे खासगी सचिव ओंकार बाळकृष्ण थोरात यांनी मुंबई पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये घडलेला घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. कुल यांनी पैशांची मागणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सुचना केल्या आणि सापळा रचून आरोपीला अटक केली.
□ असा घडला प्रकार
ओंकार बाळकृष्ण थोरात यांना 17 जुलै रोजी ते आकाशवाणी आमदार निवास येथे असताना दुपारी 12.12 वाजता एक फोन आला. समोरील व्यक्तीने रियाजभाई असं नाव सांगितलं. मी दिल्लीवरून आलो आहे. मला साहेबांनी मिटींगची वेळ दुपारी चार वाजता दिली आहे. आमदार कुल हे माझा फोन गेत नाहीत. त्यांची कुठे भेट होईल, असं या व्यक्तीने विचारले, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यावर थोरात यांनी मी आमदारसाहेबांशी बोलतो व तुम्हाला सांगितो असं रियाजभाईला सांगितले.
हॉटेल ओबेरॉय येथे दुपारी साडे चार वाजता थोरात यांनी कुल यांची भेट घेतली. त्यांना रियाजभाईच्या फोनबाबत सांगितले. त्यावर कुल म्हणाले की, रिजाजभाई नावाच्या माणसाने आपल्याला 12 जुलै रोजी फोन केला होता. तो बीजेपीच्या मोठ्या लोकांच्या संपर्कात असून, महाराष्ट्र सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळण्यासाठी 100 कोटी रुपये मागत होता, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
18 जुलै रोजी दुपारी 1.15 वाजता कुल यांच्या सांगण्यावरून थोरात यांनी रियाजभाईला पोन करून त्यांना एलआयसी बिल्डींग, नरिमन पॉईंट याठिकाणी येण्यास सांगितले. तो तिथे आल्यानंतर थोरात त्याला कुल यांच्याकडे घेऊन गेले. त्यानंतर तो कुल यांच्यासोबत ओबेरॉय हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी आला. त्यानंतर कुल आणि आमदार जयकुमार गोरे हे रियाजभाई याच्यासोबत कॅफिटेरियामध्ये बसले. त्यावेळी थोरात हे त्यांच्याबाजूलाच होते. त्यानंतर काही वेळात साध्या वेशातील पोलीस हॉटेलमध्ये आले व त्यांनी रियाजभाईला ताब्यात घेतल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आलं आहे.