नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे. त्यांना आतापर्यंत 6 लाख 76 हजार 803 मतं मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता देशाच्या राष्ट्रपतीपदी मुर्मू लवकरच विराजमान होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. 25 जुलै रोजी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. Declaration- Draupadi Murmu is the 15th President of the country tribal woman
द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा दणदणीत पराभव केला. विजयासाठी मुर्मू यांना 5 लाख 43 हजार 261 मतांची आवश्यकता होती. मतमोजणीच्या तिसर्या फेरीतच मुर्मू यांना 5 लाख 77 हजार 777 मते मिळाली. सिन्हा यांना 2 लाख 61 हजार 62 मते मिळाली. तीन टप्प्यात 3219 मतांची मोजणी करण्यात आली. यापैकी मुर्मू यांना 2161 मते मिळाली. यशवंत सिन्हा यांना मात्र 1058 मतांवरच समाधान मानावे लागले. तिसर्या टप्प्यात केरळ, पंजाब, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅण्ड या राज्यातील मतांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या तिसर्या फेरीनंतर यशवंत सिन्हा यांनी आपला पराभव मान्य केला आणि द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून मिळाली आहे. मुर्मू या देशातील दुसर्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती म्हणून झालेल्या ऐतिहासिक विजयाचा आज देशभर एकच जल्लोष साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी लाडू आणि पेढे वाटण्यात आले, फटाके फोडण्यात आले आणि फुलेही उधळण्यात आली. आदिवासी नृत्यही करण्यात आले. दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्ली प्रदेश भाजपाच्या कार्यालयापासून राजपथपर्यंत मिरवणूकही काढली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही महामहीम द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/586523309692069/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/586640156347051/
द्रौपदी मुर्मू यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विशेष व्यवस्था करण्यात आली होती, मांडव टाकण्यात आला होता, व्यासपीठ उभारण्यात आले होते. आदिवासी महिला पुरुष याठिकाणी आपले पारंपरिक नृत्य करत होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपत आहे, त्यामुळे 25 जुलैला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदाचा कार्यभार स्वीकारतील. राष्ट्रपतिभवनातील शानदार समारंभात भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण त्यांना राष्ट्रपतिपदाची शपथ देतील.
सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. संसद भवनात दिवसभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह 719 खासदार आणि 9 आमदार अशा एकूण 728 मतदारांनी मतदान केले. तसेच सर्व राज्यांच्या विधीमंडळात राज्याच्या आमदारांनी राष्ट्रपती पदासाठी मतदान केलं. खासदारांनी केलेल्या मतदानात मुर्मू यांना 540 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली. तर दुसऱ्या फेरीनंतर मुर्मू यांच्या मतांची संख्या 1349 इतकी झाली तर सिन्हा यांना 537 मतं मिळाली.
■ मुर्मू यांना राष्ट्रपती का करण्यात आलं?
– महिला प्रतिनिधीत्व हे मुख्य कारण आहे.
– त्या आदिवासी आहेत.
– दुर्लक्षित असणाऱ्या देशातील पूर्वेकडील [ओडिसा ] त्या येतात.
– आदिवासी समाजातील कुणी राष्ट्रपती आजवर भारतात झाले नाही, त्यामुळे भाजपने आदिवासी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचं ठरवलं.
■ द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकीर्द
– द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल असून, भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे.
– त्या 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार
झाल्या.
– तत्पूर्वी 1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून 1997 त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या.
– 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिल्या राज्यपाल होत्या.
https://www.facebook.com/109399567404448/posts/585918616419205/