मुंबई : राज्यात एकनाथ शिंदें यांनी अभूतपूर्व बंड करून राज्यात सत्तापालट केले. पण या बंडामागे आणि शिवसेना फोडण्यात शरद पवारांचाच हात असल्याची चर्चा होत होती. यावर खुद्द माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. Sharad Pawar’s hand in breaking Shiv Sena? Uddhav Thackeray gave the answer
या बंडामुळे शरद पवार निशान्यावरती आले आहेत. सातत्याने त्यांच्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे एवढेच नव्हे तर राणे, भुजबळ आणि आता शिंदेंच्या बंडालाही पवारांचीच फूस असल्याचे विविध पक्षातील लोकाकडून बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द उद्धव ठाकरेंनीच यावर खुलासा केला आहे.
उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत हे स्पष्ट केली की हे जे कोणी लोक बोलताहेत ना ते आधी भाजपबरोबर सत्तेत असतांना भाजप त्रास देतोय असं म्हणायचे शिवसेनेला काम करू देत नाही किंबहूना भाजप शिवसेनेला संपवतेय, उठसूठ हाच आक्षेप असायचा. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारल्या म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस – राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमक तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधत आहात, असा सवाल उपस्थित करीत यात शरद पवारांचा हात नसल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
शिवसेना काही संपलेली नाही आणि संपणार नाही. अनेकांना लालसा निर्माण झाली. त्यामुळे आताचे नाट्य घडवलं गेले आहे. सत्ता पिपासूपणा आता दिसून येत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590313145979752/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
निधी वगैरे दिला नाही म्हणाल तर त्या दिवशी तर अजित पवार यांनी सांगितलेय की, ह्यांच्या एका खात्याला बारा हजार कोटी दिले. काही ठिकाणी शेवटच्या काळात असमानता आहे, असं मला वाटलं तेव्हा काही निधीवाटपाला मी स्थगितीही दिली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विकास निधीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित दादा, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरु होती की, निधीवाटपात अशी असमानता असेल तर हा प्रश्न आपण सोडवायला हवा.आणि अधिवेशन सुरु असताना अशोकराव चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता, असा दाखलाही त्यांनी दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. फुटिरांचा असाही एक आक्षेप आहे की, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली. त्यावर ठाकरे म्हणाले, बरं! झालो मुख्यमंत्री. कारण मी आता होऊन गेलेलो आहे. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पाहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा.
□ त्यांनी टाळले, पण पवारांनी पक्षप्रमुख म्हणून केला उल्लेख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नसून तर माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्या आहेत. त्यानंतर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो’ अशा शुभेच्छा दिल्या आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळला आहे.
महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590268999317500/