पंढरपूर : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जोरदार पावसामुळे जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण तुडुंब भरले असून भीमा दुथडी भरून वाहत आहे. पंढरीचा दगडीपूल आणि नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यातच उजनीतून विसर्ग सुरू झाल्यामुळे भीमथडीला हुडहुडी लागली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Ujani Tudumba, Bhima Duthdi; Pandharpur old stone bridge underwater sugar factory
भीमा खोऱ्यात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर आवक येत आहे. त्यामुळे धरणातून 61600 क्युसेक पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. सध्या पंढरपूर येथे 32000 क्यूसेक पाणी वाहत असून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच चंद्रभागा नदीपात्रातील सर्व मंदिरे आणि समाधी पाण्याखाली गेल्या आहेत.
उजनी धरणातून गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडले जात असले तरी मागील चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी होती. उजनीवर ही 87 मिलीमीटर पाऊस झाला. हे पाहता धरणातून दिवसभरात टप्प्या टप्प्याने साठ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. भीमा खोर्यातील घोड धरणातून 23 हजार क्युसेक पाणी सोडले जात असून ते थेट उजनीत येते. तसेच दौंडचा विसर्ग ही 20 हजार क्युसेक इतका होता. हे पाहता क्षमतेने 110 टक्के भरलेल्या उजनीतून पाणी सोडणे अपरिहार्य होते.
भीमा खोर्यातील सर्व धरणांवर पावसाची हजेरी आहे. यामुळेच घोड, चासकमान, आंध्रा, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात आहे. उजनी प्रकल्प क्षमतेने भरला आहे. यात आता पाणी साठवण करण्यास जागा नसल्याने नदीत पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान निरा नदीवरील वीर प्रकल्पातून पाणी सोडणे सकाळी बंद करण्यात आले आहे.
उजनीत 122.60 टीएमसी एकूण पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणी हे 58.94 टीएमसी इतके आहे. प्रकल्पातून दहिगाव, सीना माढा योजना, भीमा सीना जोडकालवा, मुख्य कालवा यासह वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात आहे.
उजनीच्या पाण्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत असून पाणी पातळी वाढत आहे. यातच नदी परिसरात गेले काही दिवस पाऊस होत आहे. यामुळे नदीकाठी नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ‘डीजीसीए’च्या अहवालाची प्रतीक्षा, चिमणीवर १५ सप्टेंबरला सुनावणी
साेलापूर : सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालकांचा (डीजीसीए) अहवाल अद्याप आलेला नाही. या कारणास्तव चिमणीबाबतची सुनावणी १५ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
हाेटगी राेड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यास सिध्देश्वर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचा अहवाल डीजीसीएने दिला हाेता. या आधारावर महापालिकेने चिमणी पाडकामाची कारवाई हाती घेतली हाेती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात पुन्हा पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश डीजीसीएला दिले.
डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर पालिकेने सुनावणी घेऊन अहवाल सादर करावा, असे सांगितले. त्यानुसार डीजीसीएच्या पथकाने मागील महिन्यात कारखाना, विमानतळ परिसराची पाहणी केली. दरम्यान, महापालिकेत ७ सप्टेंबर राेजी सुनावणी हाेती. डीजीसीएचा अहवाल न आल्याने चिमणी प्रकरणावर १५ सप्टेंबरला सुनावणी घेण्यात येईल, आयुक्तांनी सांगितले. डीजीसीएच्या अहवालाच्या आधारे चिमणीचे भवितव्य ठरणार आहे.